शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : खंडणी देण्यास नकार दिल्याने मालिकेच्या सेटवर हल्ला, नऊ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 13:39 IST

केर्ली (ता. करवीर) येथील एका बंगल्यामध्ये सुरु असलेल्या मराठी मालिकेच्या चित्रीकरणाच्या सेटवर खंडणीसाठी उपसरपंचासह नऊ जणांनी हल्ला करुन निर्मिती प्रमुख आणि दिग्दर्शकास बेदम मारहाण केली. याशिवाय शुटींगच्या साहित्यासह कारची तोडफोड केली. याप्रकरणी करवीर पोलिसांनी नऊ जणांना अटक केली असून ही घटना सोमवारी (दि. ६) रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देकेर्ली गावच्या उपसरपंचासह नऊ जणांना अटक, दिग्दर्शकाला धक्काबुक्की, कार, साहित्याची तोडफोड

कोल्हापूर : केर्ली (ता. करवीर) येथील एका बंगल्यामध्ये सुरु असलेल्या मराठी मालिकेच्या चित्रीकरणाच्या सेटवर खंडणीसाठी उपसरपंचासह नऊ जणांनी हल्ला करुन निर्मिती प्रमुख आणि दिग्दर्शकास बेदम मारहाण केली. याशिवाय शुटींगच्या साहित्यासह कारची तोडफोड केली. याप्रकरणी करवीर पोलिसांनी नऊ जणांना अटक केली असून ही घटना सोमवारी (दि. ६) रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.

संशयित उपसरंपच अमित भिमराव पाटील (वय ३६), दगडु देवाप्पा कांबळे (५९), किरण सुरेश कांबळे (२६), चंद्रकांत मारुती कोपार्डे (३३), अक्षय हंबिराव पाटील (२६), अवधुत हंबिराव पाटील (२२), अमित पंडीत मोहिते (३३), कपील आकाराम माने (२९), रविंद्र आनंदा पाडेकर (३३, सर्व रा. केर्ली, ता. करवीर) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

करवीर तालुक्यातील केर्ली येथील कॅप्टन शंकर माने यांच्या बंगल्यामध्ये दि. १३ जून पासून ‘जुळता जुळता जुळतंय की’ या मराठी मालिकेचे चित्रीकरण सुरु आहे. या मालिकेचे प्रसारण लवकरच एका वाहिनीवरुन प्रसारित होणार आहे.

संशयित उपसरपंचासह नऊ जणांनी मालिकेचे निर्मिती प्रमुख रविंद्र सिध्दु गावडे (रा. कोल्हापूर) यांच्याकडे आमच्या गावात शुटींग करायचे असेल तर महिन्याला तीस हजार रुपये प्रोटेक्शन मनी द्यावे लागतील, अशी खंडणीची मागणी केली. मात्र, ही मागणी नाकारल्याने संशयितांनी सोमवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास कॅप्टन माने यांच्या बंगल्यात घुसून निर्मीती प्रमुख गावडे आणि दिग्दर्शक गौतम कोळी (रा. मुंबई) यांना धक्काबुक्की करत बेदम मारहाण केली.

यावेळी बंगल्यात शूटींगसाठी असलेल्या साहित्याची तसेच बंगल्याबाहेर उभ्या असलेल्या कारची (एम. एच. ०२ डी. एन. ६७२८) दगड विटांनी तोडफोड करुन दहशत माजवली. संशयित मद्यप्राशन करुन असल्याचे समजते. गावडे यांनी याप्रकारणी करवीर पोलिसांत फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करुन संशयितांना अटक केली आहे.कलाकार भयभीत, स्वत:ला कोंडून घेतलेया प्रकारामुळे या शूटींगमध्ये सहभागी असलेल्या कलाकारांची भीतीने गाळण उडाली. त्यांनी हा प्रकार सुरु असताना बंगल्यातील एका खोलीत स्वत:ला कोंडून घेतले. संशयितांनी या खोलीवर धडका मारल्या, परंतु दार बंद असल्याने त्यांनी आपला मोर्चा खोलीतील इतर साहित्याकडे वळविला. या कलाकारांमध्ये काही महिला कलाकारही होत्या. भयभीत झालेल्या कलाकारांनी या गावातील शूटींग बंद केले आहे.

 

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूर