शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :स्वातंत्र्यानंतरसुद्धा भटक्या जमातींचा संघर्ष सुरूच : इदाते, विवेकानंद महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 17:53 IST

स्वातंत्र्य प्राप्त होऊन आपल्या देशाला ७० वर्षे पूर्ण झाली तरीही भटक्या विमुक्त जमातीच्या लोकांच्या समस्या संपलेल्या नाहीत; त्यांच्या जीवनाचा संघर्ष अजूनही सुरूच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय विमुक्त, भटक्या व अर्धभटक्या जनजाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष भिकू इदाते यांनी केले. ​​​​​​​

ठळक मुद्देस्वातंत्र्यानंतरसुद्धा भटक्या जमातींचा संघर्ष सुरूच : इदातेविवेकानंद महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र

कोल्हापूर : स्वातंत्र्य प्राप्त होऊन आपल्या देशाला ७० वर्षे पूर्ण झाली तरीही भटक्या विमुक्त जमातीच्या लोकांच्या समस्या संपलेल्या नाहीत; त्यांच्या जीवनाचा संघर्ष अजूनही सुरूच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय विमुक्त, भटक्या व अर्धभटक्या जनजाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष भिकू इदाते यांनी केले.विवेकानंद महाविद्यालयात समाजशास्त्र विभागाच्या वतीने ‘अर्धभटक्या, भटक्या आणि विमुक्त जमातींच्या सामाजिक, आर्थिक समस्या’ यावर एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे होते. साहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.इदाते म्हणाले, स्वातंत्र्यप्राप्तीसाठी काम करणाºया या समाजाला आज गुन्हेगार, भिकारी तसेच बेघर बनविले गेले आहे, ही सर्वांत मोठी समस्या आहे. माणसाला माणसाचा दर्जा दिला पाहिजे. यासाठी भटक्या-विमुक्तांना शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि मानवी हक्क ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.गायकवाड म्हणाले, काबाडकष्ट करणाऱ्या माणसाचा चेहरा नेहमी काळा असतो. त्याच्या मनगटात जगण्याची ताकद असते. समाजाने जाती व धर्मव्यवस्था यांची तटबंदी करून भटक्या विमुक्तांना समाजबाह्य केले आहे, शिक्षणाच्या प्रगतीने त्यांच्यातील अज्ञान, अंधकार दूर होतील. समाज परिवर्तनासाठी साहित्य आणि चळवळ यांचे योगदान फार मोठे आहे. त्यामुळेच या भटक्या जमाती निश्चितच आपल्यात परिवर्तनाची क्रांती करतील व समाज विकास साधतील.समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. ए. पी.जाधव यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर यांनी स्वागत केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. विकास मस्के यांनी करून दिला; तर प्रा. सुशील कोरटे यांनी आभार मानले.

समीर मुजावर व अमृता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. या चर्चासत्रासाठी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार सी. बी. दोडमणी, निबंधवाचक प्राचार्य डॉ. आनंद मेणसे, राम राठोड, डॉ. नारायण भोसले, डॉ. संजय कोळेकर, डॉ. धनराज पाटील, महाराष्ट्राच्या विविध विद्यापीठांतील प्राध्यापक, अभ्यासक, संशोधक उपस्थित होते. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollegeमहाविद्यालय