शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

कोल्हापूर : अवैध बांधकामप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 11:43 IST

गांधीनगर रस्त्यावरील तावडे हॉटेल ते निगडेवाडीपर्यंतच्या अवैध बांधकामप्रकरणी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनातर्फे शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. यावर आता पुढील सुनावणी ४ सप्टेबर रोजी होणार आहे.

ठळक मुद्देअवैध बांधकामप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रआता पुढील सुनावणी ४ सप्टेबर रोजी

कोल्हापूर : गांधीनगर रस्त्यावरील तावडे हॉटेल ते निगडेवाडीपर्यंतच्या अवैध बांधकामप्रकरणी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनातर्फे शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. यावर आता पुढील सुनावणी ४ सप्टेबर रोजी होणार आहे.गांधीनगर रस्त्यावरील महानगरपालिका क्षेत्रात झालेल्या अवैध बांधकामप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. अवैध बांधकामांना अभय द्यावे, महापालिकेच्या कारवाईला प्रतिबंध करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

या याचिकेवर सुनावणी झाली तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने ‘जैसे थे’चा आदेश दिला आहे. त्याचवेळी महापालिकेच्या वकिलांनी महापालिकेच्या वादग्रस्त जागेवर अवैध बांधकामे सुरूच असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यावेळी न्यायालयाने या बांधकामासंबंधीचे पंचनामे करून सध्याची स्थिती काय आहे, याबाबत छायाचित्रे तसेच प्रतिज्ञापत्राद्वारे माहिती देण्याचे आदेश दिले. त्यानुसार महानगरपालिका प्रशासनाने शुक्रवारी हे प्रतिज्ञापत्र सादर केले.यावेळी न्यायालयात महापालिकेचे वकील ज्येष्ठ विधितज्ज्ञ मारलापल्ले, विनय नवरे, नगररचनाचे सहायक संचालक धनंजय खोत उपस्थित होते. प्रतिज्ञापत्र सादर झाल्यानंतर याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी त्यावर अभ्यास करण्याकरिता वेळ मागून घेतली; त्यामुळे याचिकेवर आता ४ सप्टेबर रोजी सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात आले. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर