शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
2
"प्रभू श्रीराम सगळ्यांचे... मी दलित म्हणून मला बोलवलं नाही"; अयोध्या खासदाराचा नाराजीचा सूर
3
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
4
Ahilyanagar: मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून बेदम मारहाण!
5
Apple नंतर ही कम्प्युटर बनवणारी 'ही' दिग्गज कंपनी ६००० कर्मचाऱ्यांची कपात करणार, का घेतला हा मोठा निर्णय?
6
१० वर्षांत १ कोटींचा टप्पा गाठायचा आहे? SIP द्वारे कोणत्या फंडात आणि किती गुंतवणूक करणे फायदेशीर!
7
महालक्ष्मी व्रतकथा: महालक्ष्मी व्रत कथेशिवाय पूजा अपूर्ण; पती-पत्नीने मिळून वाचल्यास मिळते अधिक फळ!
8
घटस्फोट, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणानंतर सेलिना जेटलीची पहिली पोस्ट; म्हणाली, "माझी मुलं..."
9
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
10
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
11
मार्गशीर्षातला पहिला गुरुवार, महालक्ष्मी व्रताची तयारी झाली का? वाचा साहित्य आणि पूजाविधी
12
गरिबांसाठीच्या योजनांवर १ लाख कोटी रुपयांचा खर्च; लोककल्याणाचा उदात्त हेतू, पण सरकारी तिजोरीवर वाढता ताण
13
Stock Market: ३ दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २४५ अंकांनी वधारला; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
14
टीम इंडियाची लाजिरवाणी कामगिरी! स्टार क्रिकेटर म्हणाला, 'ही' आमच्यासाठी विन-विन सिच्युएशन ठरेल!
15
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
16
पेन्शन, टॅक्स पासून एलपीजी पर्यंत; १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम
17
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
18
देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा?
19
धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
20
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
Daily Top 2Weekly Top 5

व्हिएतनाममधील मल्लभूमीवर कोल्हापूरच्या आदित्यचा झंझावात; ग्रीको रोमन शैलीत आशियाई कुस्ती स्पर्धेत रौप्य

By संदीप आडनाईक | Updated: June 24, 2025 20:14 IST

कोल्हापूरच्या कुस्ती परंपरेचे नाव उज्वल

संदीप आडनाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील नरतवडे गावचा सुपुत्र, उसतोड कामगाराचा मुलगा आदित्य दिलीप जाधव याने मंगळवारी व्हिएतनामच्या मल्लभूमीवर रौप्यपदक पटकावले. या आशियाई कुस्ती स्पर्धेत १७ वर्षाखालील वयोगटात भारतीयांसाठी कठीण असलेल्या ग्रीको रोमन शैलीत त्याने पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घातली. त्याच्या ताकदीच्या झंझावाताने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे आणि कोल्हापूरच्या कुस्ती परंपरेचे नाव उज्वल केले आहे.

व्हिएतनाममधील वुंग ताउ येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील ग्रीको रोमन विभागात ४८ किलो गटाच्या अंतिम लढतीत आदित्यला कझाकस्तानच्या कुमारुली नूरदौलेत याच्याविरुद्ध हार पत्करावी लागली. त्यापूर्वी आदित्यने उपांत्य फेरीत किर्गिझस्तानच्या अब्दुल्लाझिझ ओईबेकोविच मोमिनोव याला ११-१ असे सहज हरवले होते. आदित्यने स्पर्धेत सुरुवात करताना बुन्योद हासानोव याच्यावर ३-१ असा विजय मिळवला होता.

नरतवडे येथील जाधव कुटुंबीय गरीब आहे. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातून ते कामाच्या शोधासाठी कोल्हापुरात आले. ऊसतोड करून ते कुटुंबाचा चरितार्थ चालवतात. आदित्यने कोल्हापुरातील स्थानिक कुस्ती स्पर्धा गाजवल्या होत्या. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडून बालेवाडी येथे घेतलेल्या राज्य निवड चाचणीत ४८ किलो गटात त्याने ग्रीको रोमन प्रकारात सुवर्णपदक मिळवले. हरयाणा येथील पलवल येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत याच वजनी गटात याच प्रकारातही त्याने सुवर्णपदक मिळवले. त्यानंतर त्याची व्हिएतनामच्या आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. त्याने यापूर्वीही खेलो इंडिया स्पर्धेत कास्यपदक तसेच अनेक राष्ट्रीय स्पर्धेतही यश मिळवले होते. सरवडे येथील वि्ठ्ठलाई कुस्ती संकुलात प्रशिक्षक सागर पाटील, शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने सराव केला. सध्या तो बेळगावच्या मराठा लाइट इन्फंट्रीच्या बॉइज स्पोर्ट्स केंद्रात प्रशिक्षक रणजित महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्यांनीच त्याला ग्रीको रोमनचे कठीण कौशल्य शिकविले.

ऋतुजा गुरवही फायनलमध्ये 

कोल्हापूरच्या ऋतुजा संतोष गुरव हिनेही १७ वर्षाखालील वयोगटात व्हिएतनाम  येथील आशियाई अजिंक्यपद  कुस्ती स्पर्धेची अंतिम  फेरी गाठली आहे. पलवल (हरयाणा) येथील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ४६ किलो वजनीगटात सुवर्णपदक मिळवून तिने आशियाई स्पर्धेत  प्रवेश मिळवला आहे. ती सध्या कोल्हापूरातील खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रात सराव करत आहे. तिला कोल्हापूरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस तसेच कुस्ती प्रशिक्षक मानतेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर