शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : वादग्रस्त कर्मचाऱ्यांच्या चौकशीनंतर कारवाई : अधिष्ठातांचे ‘पतित पावन’ला आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:57 IST

नोकरीसाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देणाºया कर्मचाºयांवर चौकशी करून ३१ डिसेंबरपर्यंत कारवाई करण्याचे आश्वासन राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी बैठकीमध्ये

ठळक मुद्देशासकीय महाविद्यालयातील बनावट प्रमाणपत्र प्रकरण

कोल्हापूर : नोकरीसाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देणाºया कर्मचाºयांवर चौकशी करून ३१ डिसेंबरपर्यंत कारवाई करण्याचे आश्वासन राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी बैठकीमध्ये दिल्याने पतित पावन संघटनेचे नियोजित ठिय्या आंदोलन बुधवारी स्थगित करण्यात आले. या चर्चेवेळी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक वसंत बाबर हेही उपस्थित होते.

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सीपीआर रुग्णालयात नोकरी मिळविण्यासाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र जोडण्यात आल्याची माहिती गेल्या वर्षी उघडकीस आली. त्या अनुषंगाने चौकशीची कार्यवाही सुरू होती. त्याबाबतचा अहवाल दि. ५ डिसेंबर रोजी प्रशासनास प्राप्त होऊनही कारवाई न केल्याच्या निषेधार्थ येथील पतित पावन संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुनील पाटील यांनी बुधवारपासून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.त्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी बुधवारी सीपीआर रुग्णालयात बैठक आयोजित केली होती.

यावेळी पतित पावन संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील, बजरंग दल जिल्हाप्रमुख बंडा साळुंखे, महेश उरसाल, राजेंद्र सूर्यवंशी, विशाल पाटील, अवधूत भाट्ये, सूरज निकम, आशिष बराले, सतीश निकम, ऋषभ मोरे, निवास पाटील, राजू पाटील, समीर सुतार हे संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.तत्काळ निलंबन कराया वादग्रस्त कर्मचाºयांचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यांच्यावर कारवाईसाठी महिन्याची मुदत द्यावी, अशी मागणी डॉ. नणंदकर यांनी केली; पण संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला. गेली १५ वर्षे या कर्मचाºयांनी नोकरी केली आहे, त्यांच्याकडून दिलेले भत्ते व सेवासुविधा वसूल कराव्यात; त्यांना तत्काळ निलंबित करावे, अशी आग्रही मागणी केली; पण त्यांना नोटीस काढून कारवाई प्रक्रियेचे आश्वासन दिले. त्यामुळे संघटनेने त्यांना ३१ डिसेंबरपर्यंत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्याबाबत प्रशासनाने कारवाईचे लेखी आश्वासन संघटनेस दिले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिसjobनोकरी