शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :  फेरीवाल्यांवर कारवाई झाल्यास संघर्ष, फेरीवाला संघटनांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 12:48 IST

कोल्हापूर शहरातील फेरीवाल्यांचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे, याची दखल घेऊन आयुक्तांनी महापालिका प्रशासन, पोलीस, फेरीवाले प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक त्वरित आयोजित करावी. फेरीवाल्यांवर एकतर्फी कारवाई झाल्यास संघर्ष अटळ आहे, असा इशारा फेरीवाल्यांनी दिला आहे.

ठळक मुद्देफेरीवाल्यांवर कारवाई झाल्यास संघर्ष फेरीवाला संघटनांचा इशारा

कोल्हापूर : शहरातील फेरीवाल्यांचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे, याची दखल घेऊन आयुक्तांनी महापालिका प्रशासन, पोलीस, फेरीवाले प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक त्वरित आयोजित करावी. फेरीवाल्यांवर एकतर्फी कारवाई झाल्यास संघर्ष अटळ आहे, असा इशारा फेरीवाल्यांनी दिला आहे.कोल्हापूर जनशक्तीच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महानगरपालिकेच्या वतीने शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येत आहे. सदर मोहीम प्रामुख्याने होर्डिंग, अनधिकृत फलकांविरोधात असल्याचे सांगितले जात असले तरी त्याचा फटका फेरीवाल्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. महापालिकेने पथविक्रेता अधिनियम २०१४ ची अंमलबजावणी करावी, अशी फेरीवाला संघटनांची मागणी आहे.शहरातील फेरीवाल्यांना यापूर्वी २०१३-१४ साली बायोमेट्रिक कार्ड देण्यात आले होते; परंतु महापालिका प्रशासनाच्या चालढकल भूमिकेमुळे शहरातील झोन निश्चितीचे काम रखडले आहे. परिणामी फेरीवाल्यांना महापालिका व वाहतूक पोलिसांची टांगती तलवार घेऊनच काम करावे लागत आहे. यापूर्वी निवेदने, निदर्शने, मोर्चा काढूनही प्रशासन जागे झालेले नाही.

नुकतेच १ डिसेंबरपासून फेरसर्व्हेक्षण करणार असल्याचे जाहीर केले होते; परंतु महिना संपत आला तरी एकाही फेरीवाल्याचा सर्व्हे केलेला नाही, असेही पत्रकात म्हटले आहे. जर लवकरात लवकर बैठक घेऊन फेरीवाल्यांचा प्रश्न मार्गी लावला नाही तर संघर्ष अटळ आहे, असा इशारा सुभाष वोरा, दिलीप पवार, समीर नदाफ, प्र. द. गणपुले, महंमद शरीफ शेख, मारुती भागोजी यांनी दिला आहे. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर