कोल्हापूर : महापालिकेच्या चौकात कोल्हापूर कृती समितीच्या पदाधिकाऱ्यास मारहाण करण्यात आली. शिवाजी पेठ परिसरातील कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण करत शिवीगाळ केली. ही घटना आज, बुधवार दुपारच्या सुमारास महापालिकेत घडल्याने एकच खळबळ उडाली. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मारहाण झालेला कृती समितीचे निमंत्रक महापालिकेत शिष्टमंडळासोबत माहिती घेण्यासाठी आले होते. यावेळी शिवाजी पेठ परिसरातील कार्यकर्त्यांनी संबंधित निमंत्रकास माहिती अधिकाऱ्याच्या माध्यमातून आंदोलन का करता असा जाब विचारत मारहाण केली. यासर्व प्रकारामुळे महापालिकेत एकच गोंधळ उडाला. अद्याप मात्र या घटनेची नोंद पोलिसात झाली नाही.
कोल्हापूर कृती समितीच्या पदाधिकाऱ्यास महापालिकेत मारहाण, उडाली एकच खळबळ
By भीमगोंड देसाई | Updated: January 18, 2023 16:49 IST