शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ‘पर्यटन’मधून ‘राधानगरी-दाजीपूर’साठी ९४ लाखांचा निधी : प्रकाश आबिटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 12:14 IST

राज्य शासनाच्या सन २०१७-१८ च्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत राधानगरी-दाजीपूर अभयारण्य पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी ९४ लाख ३३ हजारांचा निधी मंजूर झाला आहे. ३१ मार्च २०१८ च्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून शासन निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली.

ठळक मुद्देराधानगरी-दाजीपूर अभयारण्य पर्यटनदृष्ट्या विकसित करणार ‘पर्यटन’मधून ९४ लाखांचा निधी : प्रकाश आबिटकर

कोल्हापूर : राज्य शासनाच्या सन २०१७-१८ च्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत राधानगरी-दाजीपूर अभयारण्य पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी ९४ लाख ३३ हजारांचा निधी मंजूर झाला आहे. ३१ मार्च २०१८ च्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून शासन निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली.राधानगरी तालुक्यातील निपाणी ते दाजीपूर रस्ता रा. मा. १७८, मांजरखिंड (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथे जंक्शन सुधारणा व चौक सुशोभीकरण करण्याकरिता ९४ लाख ३३ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये रिटर्न वॉल बांधणे, अर्थ वर्क अ‍ॅँड ग्रेड वन, एम. पी. एम. आणि कारपेट, पेव्हिंग ब्लॉक व निवारा शेड मंजूर करण्यात आले आहेत.

फेजीवडे येथील जंक्शन सुधारणा व चौक सुशोभीकरण करण्याकरिता ३६ लाख ९१ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये रिटर्न वॉल बांधणे, अर्थ वर्क अ‍ॅँड ग्रेड वन, कारपेट, पेव्हिंग ब्लॉक व निवारा शेड मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे अभयारण्याच्या सौंदर्यामध्ये भर पडणार आहे.

राज्यमार्गावरील पर्यटकांना आकर्षित करण्याकरिता अभयारण्याची सुरुवात असणाऱ्या मांजरखिंड व छत्रपती शाहू महाराजांच्या संकल्पनेतून साकारलेला राधानगरी धरणस्थळ चौक सुशोभीकरण होणार असून, यामुळे पर्यटकांना दाजीपूर अभयारण्यामधील पशुपक्षी व निसर्गसौंदर्याची थोडक्यात माहिती होणार आहे. यामुळे पर्यटन विकासाला चालना मिळणार असल्याचे आमदार आबिटकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे म्हटले आहे.विविध विकासकामांची उद्घाटने अभयारण्य परिसरात घेण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव फुलपाखरू उद्यान उभारणे (२८ लाख), राऊतवाडी धबधब्याचा परिसर सुशोभीकरण करणे (५० लाख), दाजीपूर येथे अत्याधुनिक तंबू निवासस्थान बांधणे (३० लाख), उगवाईदेवी व कोकण दर्शन पॉइंट विकसित करणे (४ लाख) यांसह अभयारण्य विकसित करण्याकरिता अनेक कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.

यामध्ये दाजीपूर येथे पर्यटकांसाठी अ‍ॅम्पिथिएटर उभारणे, दाजीपूर येथे पर्यटकांसाठी युवक गृह (डॉर्मेटरी) उभारणे, राधानगरी येथे युवक गृहा (डॉर्मेटरी)मध्ये सुधारणा करणे, राधानगरी येथे अत्याधुनिक व्ही. आय. पी. विश्रामगृह बांधणे, राधानगरी येथे पर्यटकांसाठी बांबू निवासस्थान उभारणे, दाजीपूर येथे होम स्टे संकल्पना राबविणे, आदी कामांचा समावेश असून, यामुळे राधानगरी-दाजीपूर अभयारण्याचा पर्यटनदृष्ट्या विकास होण्यासाठी चालना मिळणार आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरtourismपर्यटन