शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :  ७९ कुष्ठरोग बांधवांना जानेवारीत मानधन : अरुण वाडेकर, नऊ महिन्यांचे थकित मानधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 11:40 IST

गेल्या नऊ महिन्यांपासून शेंडा पार्कातील कुष्ठधाममधील ७९ बांधवांचे रखडलेले मानधन हे फरकासह मिळणार आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील मंजुरीनंतर मासिक एक हजार रुपयांप्रमाणे कुष्ठरोग बांधवांच्या बँक खात्यावर सुमारे साडेपाच लाख रुपयांची रक्कम जानेवारीमध्ये जमा होणार असल्याची माहिती प्रभारी आरोेग्य अधिकारी डॉ. अरुण वाडेकर यांनी दिली.

ठळक मुद्देकुष्ठधाममधील ७९ बांधवांचे रखडलेले मानधन फरकासह मिळणार महापालिकेच्या सभेत प्रशासनाकडून दोन दिवसांत मानधन देण्याचे आश्वासन नऊ महिन्यांपासून रखडले होते शेंडा पार्कातील ७९ बांधवांचे मानधन

कोल्हापूर : गेल्या नऊ महिन्यांपासून शेंडा पार्कातील कुष्ठधाममधील ७९ बांधवांचे रखडलेले मानधन हे फरकासह मिळणार आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील मंजुरीनंतर मासिक एक हजार रुपयांप्रमाणे कुष्ठरोग बांधवांच्या बँक खात्यावर सुमारे साडेपाच लाख रुपयांची रक्कम जानेवारीमध्ये जमा होणार असल्याची माहिती प्रभारी आरोेग्य अधिकारी डॉ. अरुण वाडेकर यांनी दिली.सहा दिवसांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेवक भूपाल शेटे यांनी कुष्ठरोग बांधवांच्या मानधनाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर दोन दिवसांत हे मानधन देऊ, असे आश्वासन प्रशासन दिले होते.

याबाबत प्रशासनाकडून मिळालेली माहिती अशी की, कुष्ठरोग बांधवांच्या उदरनिर्वाहासाठी तीन वर्षांपासून महापालिका प्रशासनाकडून अपंग सहाय्यता कक्षामधून कुष्ठरोगांना हे मानधन दिले जाते. दर महिन्याला प्रत्येकी एक हजार रुपये हे मानधन दिले जाते. यासाठी कुष्ठधाममधील लिप्रसी आॅफिसर यांच्याकडून त्यांच्या नावांची यादी महापालिका मागवून घेते. या यादीनुसार हे मानधन त्यांना दिले जाते.एक एप्रिल ते ३० नोव्हेंबर या कालावधीत या कुष्ठरोगबांधवांना महिन्याचे मानधन दिले गेले नाही. त्यावर सर्वसाधारण सभेत चर्चा झाली. अपंगांचा राखीव असलेला शासनाचा तीन टक्के निधी हा कुष्ठरोगी बांधवांना अपंग सहाय्यता कक्षातून दिला जातो.

यासाठी प्रशासन कुष्ठरोग यांचा प्रत्येक वर्षी नवीन कृती आराखडा तयार करते. यंदा हा आराखडा आॅगस्टच्या दरम्यान तयार झाला. त्यामुळे कुष्ठरोग बांधवांच्या मानधनाला विलंब झाला. पुढील जानेवारीत सर्वसाधारण सभा होणार आहे. या सभेत सदस्यांची मंजुरी घ्यावी लागते, त्यानंतरच या ७९ कुष्ठरोग बांधवांच्या बँक खात्यात ही रक्कम फरकासह रक्कम जमा होणार आहे.

कुष्ठरोगबांधवांना मानधन हे मिळणारच. कोणीही वंचित राहणार नाही.- डॉ. अरुण वाडेकर,प्रभारी आरोग्य अधिकारी,कोल्हापूर महापालिका. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका