शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

कोल्हापूर : ज्येष्ठ नागरिकांसाठी ६०वर्षाची वयोमर्यादा कागदावरच, ‘लोकमत’ला सदीच्छा भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 15:59 IST

लोकसभा,विधानसभा निवडणुकांवरही बहिष्कार टाकण्याच्या तीव्र भावना महाराष्ट्र  ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम)च्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या. त्याचबरोबर उंबरठा तेथे ज्येष्ठ नागरिक सभासद व गाव तेथे महासंघाची शाखा असा अजेंडा राहणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

ठळक मुद्देज्येष्ठ नागरिकांसाठी ६०वर्षाची वयोमर्यादा कागदावरच, ‘लोकमत’ला सदीच्छा भेट ‘फेस्कॉम’च्या पदाधिकाऱ्यांनी मांडल्या व्यथा, उंबरठा तेथे ज्येष्ठ नागरिक सभासद

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६५ वरुन ६० करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेऊन पाच महिने उलटले तरी तो अद्याप कागदावरच आहे. यासह अनेक विविध मागण्या शासनस्तरावर प्रलंबित आहेत. यासाठी प्रसंगी लोकसभा,विधानसभा निवडणुकांवरही बहिष्कार टाकण्याच्या तीव्र भावना महाराष्ट्र  ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम)च्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या. त्याचबरोबर उंबरठा तेथे ज्येष्ठ नागरिक सभासद व गाव तेथे महासंघाची शाखा असा अजेंडा राहणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.‘फेस्कॉम’ कोल्हापूर विभागाच्या नवनिर्वाचित कार्यकारीणीने ‘लोकमत’च्या शहर कार्यालयास सदीच्छा भेट देऊन प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी विभागीय अध्यक्ष पी. के. माने (सांगली), उपाध्यक्ष यशवंतराव चव्हाण (जत), सचिव अंजुमन खान (मिरज), सहसचिव सोमनाथ गवस, कोषाध्यक्ष शरद फडके,(कोल्हापूर), कार्यकारीणी सदस्य विजय चव्हाण (कोल्हापूर), आनंदराव पाटील (साखराळे, ता. वाळवा), महिला सदस्य डॉ. विभा शहा (कोल्हापूर) या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.सर्व कार्यकारीणीचे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांनी स्वागत केले. यावेळी उपवृत्त संपादक चंद्रकात कित्तुरे उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६५ वरुन ६० करण्याचा शासन निर्णय करुन त्याच्या अंमलबजावणीसाठी महसूल, महापालिका, समाज कल्याणसह २१ विभागांना कळविले आहे, परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे अंजुम खान यांनी सांगितले. यासह विविध मागण्यांसाठी लवकरच सर्व खासदार व आमदारांची भेट घेऊन निवेदन देऊन अधिवेशनामध्ये प्रश्न मांडण्याची विनंती केली जाईल, असे सांगितले.पी.के.माने यांनी नवीन कार्यकारीणीचा अजेंडा जाहीर केला. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिरे, गाव तिथे महासंघाची शाखा, उंबरा तेथे ज्येष्ठ नागरिकांचे सदस्यत्व, ज्येष्ठ नागरिकांनी नेत्रदान, अवयवदान, त्वचादान करावे यासाठी प्रबोधन, एकाकी ज्येष्ठांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस भेट हा उपक्रम, यासाठी महिन्यातून एकदा पोलिस व महासंघाची बैठक, हेल्पलाईन सुरु करणे, विविध योजनांमधून पेन्शनचा लाभ मिळवून देणे, शासन पातळीवरील प्रलंबित मागण्यांसाठी पाठपुरावा केला जाईल असे सांगितले. विजय चव्हाण यांनी महासंघ फक्त मागण्यांसाठी लढत नाही तर सामाजिक कार्यातून ज्येष्ठांसह समाजाचे प्रबोधन करत असल्याचे सांगितले.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटkolhapurकोल्हापूर