शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

कोल्हापूर : बालगृहातील ५४ विद्यार्थ्यांनी मिळविले दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 11:54 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील बालगृह संस्थांमध्ये चालू वर्षी ५७ मुला-मुलींनी दहावीची बोर्ड परीक्षा दिली होती. यापैकी ५४ मुला-मुलींनी घवघवीतपणे यश संपादन केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील या बालगृहांतील मुलांमध्ये सर्वाेच्च गुण ९१ टक्के आहेत.

ठळक मुद्देबालगृहातील ५४ विद्यार्थ्यांनी मिळविले दहावीच्या परीक्षेत यश मुलांमध्ये सर्वाेच्च गुण ९१ टक्के

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील बालगृह संस्थांमध्ये चालू वर्षी ५७ मुला-मुलींनी दहावीची बोर्ड परीक्षा दिली होती. यापैकी ५४ मुला-मुलींनी घवघवीतपणे यश संपादन केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील या बालगृहांतील मुलांमध्ये सर्वाेच्च गुण ९१ टक्के आहेत.वाय.डी. माने बालगृहामधील एका विद्यार्थ्यांने ९१ टक्के, देवचंद शहा बालगृहामधील एका विद्यार्थ्यांने ८५ टक्के, मुलांचे निरीक्षणगृह, कागल आणि मुलींचे निरीक्षणगृह, कोल्हापूर येथील एकेक विद्यार्थ्यांना ८0 टक्के गुण मिळाले आहेत. इतर मुला-मुलींनीही चांगले गुण मिळवून यश संपादन केले आहे.काळजी आणि संरक्षणाची गरज असणाऱ्या या मुला-मुलींना बालगृहांमध्ये बालकल्याण समितीमार्फत प्रवेश दिला जातो. त्यामुळे बिकट परिस्थितीतून आल्यानंतर संस्थेत राहून असे यश संपादन करणे हे निश्चितच कौतुकास्पद आहे. समस्याग्रस्त कौटुंबिक वातावरणातून बालगृहांत दाखल झालेल्या या मुला-मुलींच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.देवचंद शहा बालगृहातील १३ पैकी १२, वाय.डी. माने बालगृहातील १२ पैकी १२, कागल येथील निरीक्षणगृहातील ८ पैकी ७, अनिकेत निकेतनमधील ४ पैकी ३, कोल्हापुरातील मुलींच्या निरीक्षणगृहातील २ पैकी २, मुलांच्या निरीक्षणगृहातील ६ पैकी ६, मुलींच्या बालगृहातील १0 पैकी १0 तसेच अवनि बालगृहातील २ पैकी २ विद्यार्थी या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. आभास फाउंडेशनचे अध्यक्ष अतुल देसाई यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.बालकल्याण संकुल संचलित डॉ. सर्वपल्ली निरीक्षणगृह, कन्या बालगृह, कन्या निरीक्षणगृह आणि अनिकेत निकेतन बालगृहातील एकूण २२ विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती.

या बालगृहातील हरीश गजानन पाटील (८१ टक्के), ऋतुजा संजय चव्हाण (८0), कोमल राजाराम शिंदे (७५), विद्या संजय लव्हटे (७२), अश्विनी दत्ता साळे (६८), आरती संजय शिंदे (६७), सुप्रिया सुभाष नाईक (६६), सुफियान मेहबूब शेख (६५), सुमित सर्जेराव इंगळे (६४), यश सचिन राणे (६४), दिव्या यशवंत कांबळे (५७), पूनम राजू सावंत (५५), शुभम परशुराम खोत (५५), भाग्यश्री सुरेश सुतार (५४) या विद्यार्थ्यांनी यश मिळविले.

या विद्यार्थ्यांना शाळेतील पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे तसेच संबंधित शाळेतील शिक्षकांचेही सहकार्य लाभल्याची माहिती बालगृहाच्या मानद कार्यवाह पद्मजा तिवले यांनी दिली आहे.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSSC Results 2018दहावी निकाल २०१८