शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : पर्यावरण बालनाट्य महोत्सव ३० तारखेला, पारितोषिकात वाढ, शालेय संघांना प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 13:19 IST

इकोफोक्स व्हेंचर्स, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि प्रतिज्ञा नाट्यरंगच्या विद्यमाने ३० तारखेला राज्यस्तरीय माध्यमिक पर्यावरण बालनाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरण बालनाट्यांना प्रोत्साहन म्हणून यंदाच्यावर्षीपासून लेखन, दिग्दर्शन, सांघिक सर्वोत्कृष्ट बालनाट्याच्या रोख परितोषिकंमध्ये वाढ करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे पर्यावरण बालनाट्य महोत्सव ३० तारखेलापारितोषिकात वाढ, शालेय संघांना प्रवेशकेशवराव भोसले नाट्यगृहात महोत्सव

कोल्हापूर : इकोफोक्स व्हेंचर्स, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि प्रतिज्ञा नाट्यरंगच्या विद्यमाने ३० तारखेला राज्यस्तरीय माध्यमिक पर्यावरण बालनाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरण बालनाट्यांना प्रोत्साहन म्हणून यंदाच्यावर्षीपासून लेखन, दिग्दर्शन, सांघिक सर्वोत्कृष्ट बालनाट्याच्या रोख परितोषिकंमध्ये वाढ करण्यात आली आहे.केशवराव भोसले नाट्यगृहात होणाऱ्या या महोत्सवात ग्रामीण व शहरी विभागासाठी स्वतंत्र पारितोषिक देण्यात येणार आहेत. महोत्सवाचे यंदाचे अकरावे वर्ष असून विद्यार्थीदशेतच मुला-मुलींमध्ये पर्यावरणविषयी जागरूकता निर्माण व्हावी, अंगभूत अभिनय कलेला योग्य दिशा मिळावी या उद्देशाने हा महोत्सव आयोजित केला जातो. त्यात ‘सर्वोत्कृष्ट सांघिक बालनाट्य’, ‘सर्वोत्कृष्ट लेखन’, ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन’ या विभागात तीन क्रमांक व सर्वोत्कृष्ट अभिनय मुले, मुली विभागात दोन क्रमांक काढण्यात येणार आहेत.स्पर्धेत संघांनी पर्यावरणाशी संबंधित विषयांवर दहा ते बारा मिनिटांत सादरीकरण करणे अपेक्षित आहे. स्पर्धेत केवळ शालेय संघांनाच प्रवेश देण्यात येणार असून त्यात माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना सहभाग घेता येईल.

स्पर्धेचे प्रवेश अर्ज मनिष गाला,आभूषण, ५५६ डी, पानलाईन, पापाची तिकटी येथे सकाळी अकरा ते रात्री आठ या वेळेत मिळतील. अधिक माहितीसाठी प्रशांत जोशी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcultureसांस्कृतिक