शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ‘केआयटी’तील पासपोर्ट शिबीरात १६७४ जणांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 15:59 IST

पुणे येथील विभागीय प्रादेशिक पारपत्र (पासपोर्ट) कार्यालय आणि केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील ‘फास्टपोर्ट-फॅकल्टी, स्टुडंन्टस, स्टाफ विथ पासपोर्ट’ याउपक्रमांतर्गत केआयटीमध्ये पासपोर्ट नोंदणी शिबीर आयोजित केले आहे. त्यात १६७४ विद्यार्थी, प्राध्यापकांनी सहभाग घेतला.

ठळक मुद्दे‘केआयटी’तील पासपोर्ट शिबीरात १६७४ जणांचा सहभागनोंदणी सुरू; तीन हजार विद्यार्थ्यांना लाभ

कोल्हापूर : पुणे येथील विभागीय प्रादेशिक पारपत्र (पासपोर्ट) कार्यालय आणि केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील ‘फास्टपोर्ट-फॅकल्टी, स्टुडंन्टस, स्टाफ विथ पासपोर्ट’ याउपक्रमांतर्गत केआयटीमध्ये पासपोर्ट नोंदणी शिबीर आयोजित केले आहे. त्यात १६७४ विद्यार्थी, प्राध्यापकांनी सहभाग घेतला.याशिबिराचे उदघाटन मंगळवारी (दि. १६) केआयटीचे उपाध्यक्ष सुनिल कुलकर्णी, संचालक डॉ. व्ही. व्ही. कार्जीन्नी, कॉमन सर्व्हिस सेंटरचे जीवन शिंदे, माजी विद्यार्थी विनायक पाचलग यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी उपाध्यक्ष कुलकर्णी यांनी सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्याकडे पासपोर्ट असणे किती महत्वाचे आहे, याबद्दलचे मत व्यक्त केले.

डॉ. कार्जीन्नी यांनी पासपोर्ट नोंदणी वेळी त्यांना आलेले काही अनुभव सांगितले. त्यांच्या पासपोर्ट नोंदणीचे काम सुरु आहे. या शिबिराच्या आयोजनास पुणे येथील विभागीय प्रादेशिक पारपत्र (पासपोर्ट) कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी अनंत ताकवले, प्रोटोकॉल इनचार्ज जतीन पोटे, केआयटीचे अध्यक्ष भरत पाटील, सचिव दिपक चौगुले, रजिस्ट्रार डॉ. एम. एम. मुजुमदार यांचे मार्गदर्शन लाभले. शिबिराचे आयोजन डॉ. अक्षय थोरवत, रोट्रॅक्ट क्लब आॅफ केआयटी सनशाईनचे समन्वयक डॉ. संदीप देसाई, विद्यार्थी अध्यक्ष सनत चेन्दवणकर, आदींनी केले.

ज्ञानेश्वर मुळे यांचे मार्गदर्शनया कार्यक्रमादरम्यान परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातुन उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी पासपोर्ट नोंदणीचे महत्व सांगितले. या शिबिरात एकूण १६७४ हुन अधिक विद्यार्थी, प्राध्यापकांनी सहभाग घेतला आहे. शिबीराचा तीन हजार विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.

 

 

टॅग्स :passportपासपोर्टcollegeमहाविद्यालयkolhapurकोल्हापूर