शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

(कोजिमाशि) कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची पतसंस्थेमधील नोकरभरती न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 11:43 IST

कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची पतसंस्थेमधील (कोजिमाशि) होणाऱ्या नोकर भरती विरोधात सहकार न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती संस्थेचे माजी सभापती संजय पाटील यांनी पत्रकातून दिली.

ठळक मुद्देसंस्थेवर अतिरिक्त बोजा पडणार : संजय पाटील यांची माहिती याविरोधात सहकार न्यायालयात दाद सर्वसाधारण सभेत भरती गरजेची म्हणणारे विरोधात कसे? : संजय डवरसर्वसाधारण सभेबरोबर सहकार खात्याची परवानगी घेऊन प्रक्रिया सुरू

कोल्हापूर ,दि. ०२ :  कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची पतसंस्थेमधील (कोजिमाशि) होणाऱ्या नोकरभरतीविरोधात सहकार न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती संस्थेचे माजी सभापती संजय पाटील यांनी पत्रकातून दिली.

संस्थेचे ८७८८ सभासद असून, अकरा शाखांमध्ये सध्या ४८ कर्मचारी कार्यरत आहेत. पण मुख्य कार्यालय, मंगळवार पेठ शाखा व शाहूपुरी शाखा स्वतंत्र दाखवून जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे ३२ कर्मचारी भरतीस परवानगी घेतली आहे.

यापूर्वी २०१३-१४ मध्ये तत्कालीन संचालकांनी असाच प्रयत्न केला होता, त्याला न्यायालयाने स्थगिती दिली होती. सध्याच्या कर्मचाऱ्याच्या पगारावर २ कोटी २० लाख रुपये खर्च होत असताना नव्याने ३२ कर्मचाऱ्याची भरती कशासाठी?

वाढीव कर्मचाऱ्याच्या पगारावर दीड ते दोन कोटी रुपये पगारापोटी खर्च पडणार आहे. त्याचा परिणाम संस्थेवर होणार असून, संस्थेच्या नुकसानीस सर्वस्वी कारभारी संचालक जबाबदार राहतील.

याविरोधात सहकार न्यायालयात दाद मागितल्याचे संजय पाटील, राजेंद्र पाटील, बी. के. मोरे, प्रशांत पोवार, ए. एम. पाटील, एस. एस. कांबळे, आर. व्ही. करडे, एस. एस. पाटील, एम. जी. पाटील, बाळासो गिरीबुवा यांनी पत्रकात म्हटले आहे.

(कोजिमाशि) सभासदांची मागणी म्हणूनच नोकरभरती-संजय डवरगेले पंधरा वर्षांत पतसंस्थेची उलाढाल सहा पटीने वाढली असून, शाखा विस्तारामुळे बहुतांशी शाखांचा डोलारा दोन-दोन कर्मचाऱ्यांवर सुरू आहे. यामुळे सभासद व ठेवीदारांना वेळेत सेवा देता येत नसल्याने संचालक मंडळाने सर्वसाधारण सभेबरोबर सहकार खात्याची परवानगी घेऊन प्रक्रिया सुरू केल्याची माहिती सभापती संजय डवर व तज्ज्ञ संचालक दादासाहेब लाड यांनी पत्रकातून दिली.

पंधरा वर्षांपूर्वी म्हणजे २००२ ला चार हजार सभासद व ६२ कर्मचारी कार्यरत होते. त्यापेक्षा सहा पटीने व्यवहार वाढला, सेवानिवृत्त, राजीनामे व मयत या कारणाने पंधरा कर्मचारी कमी झाले. त्याचा ताण शाखांवर पडत असून, सहा शाखा केवळ दोन कर्मचाऱ्यांवर सुरू आहेत.

पूर्वीच्या मंडळींनी भरतीत नातेवाईकांचा भरणा केला, आम्ही तसे करणार नसून, स्टाफिंग पॅटर्नला अधीन राहून सभासद, सेवानिवृत्त सभासद, मयत सभासद यांच्या पाल्यांना प्राधान्य देणार आहे. लेखी, तोंडी परीक्षा घेऊन पात्र उमेदवारांनाच संधी दिली जाणार आहे.

रोजंदारी वेतन पद्धतीवर कर्मचारी घेणार असून, सर्वसाधारण सभेत तक्रारदार संजय पाटील याचे समर्थन केले होते. मग आता तक्रार कशासाठी? निवडणुकीतील पराभवाने वैफल्यग्रस्त होऊन संजय पाटील संस्थेची बदनामी करत आहेत, पण हा डाव सभासद मोडीत काढतील, असे डवर व लाड यांनी पत्रकात म्हटले आहे. 

 

टॅग्स :Teacherशिक्षकbankबँक