शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

शीतल चंद्रप्रकाशात कोजागिरी साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 12:08 IST

kojagiri, kolhapunrews, gardan, terese धार्मिक तसेच सांस्कृतिक परंपरेचे कोंदण लाभलेली कोजागिरी पौर्णिमा शुक्रवारी जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने साजरी केली. यंदा कोजागरीवर कोरोनाचे सावट असल्याने तसेच शहरातील सर्वच उद्याने बंद राहिल्यामुळे पौर्णिमेच्या शीतल चंद्रछायेत सहकुटुंब उद्यानात बसून गोड भोजनाचा आस्वाद घेणे शहरवासीयांना शक्य झाले नाही. मात्र, पर्याय म्हणून घराचे टेरेसवर बसून काहींनी आनंद घेतला.

ठळक मुद्देशीतल चंद्रप्रकाशात कोजागिरी साजरी उद्याने बंद राहिल्याने घरांच्या टेरेसवर भोजनाचा आस्वाद

कोल्हापूर : धार्मिक तसेच सांस्कृतिक परंपरेचे कोंदण लाभलेली कोजागिरी पौर्णिमा शुक्रवारी जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने साजरी केली. यंदा कोजागरीवर कोरोनाचे सावट असल्याने तसेच शहरातील सर्वच उद्याने बंद राहिल्यामुळे पौर्णिमेच्या शीतल चंद्रछायेत सहकुटुंब उद्यानात बसून गोड भोजनाचा आस्वाद घेणे शहरवासीयांना शक्य झाले नाही. मात्र, पर्याय म्हणून घराचे टेरेसवर बसून काहींनी आनंद घेतला.कोजागिरीला हिंदू धर्मात फार महत्त्व आहे. कोजागिरीच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण १६ कलांमध्ये असतो. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वांत जवळ असतो आणि त्यामुळे तो मोठा दिसतो. या रात्री बारा वाजल्यानंतर अमृत पाझरत असल्याचा समज असून त्याच्या सहवासातील प्रत्येकाला आरोग्याचा लाभ होतो असे मानले जाते. तसेच या रात्री लक्ष्मी देवी पृथ्वीतलावावर येत असते अशी लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे अनेक घरांतून मध्यरात्रीनंतर लक्ष्मी देवीची पूजा करण्यात आली. घरासमोर रांगोळी काढण्यात आल्या होत्या.घरासमोर दूध उकळून या दुधात चंद्राचे प्रतिबिंब पाहिल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक असल्याचा सांगण्यात येते. म्हणून रात्री नऊ वाजल्यापासून ठिकठिकाणी दूध उकळून पिण्यावर अनेकांचा भर होता. गोड व गरम दुधाचा अनेकांनी आस्वाद घेतला. काही कॉलनीतून दूध वाटपही करण्यात आले. सहकुटुंब-सहपरिवार रात्री टेरेसवर बसून भोजनाचा आनंद घेण्यात आला. रात्री उशिरापर्यंत शीतल चंद्रप्रकाश न्याहाळण्यात कुटुंबे रंगली होती.

ब्ल्यू मून दर्शनाचा आज योेग

कोल्हापूर : महिन्यातून एकदा होणारे पूर्णचंद्राचे दर्शन या महिन्यात दुसऱ्यांदा अनुभवाला मिळणार आहे. एकाच महिन्यात दुसऱ्यांदा पूर्णचंद्र दिसल्यास त्यातील दुसऱ्या चंद्राला ‘ब्ल्यू मून’ असे म्हणतात. या योग आज, शनिवारी ३१ ऑक्टोबरला रात्री ८ वाजून १९ मिनिटांनी अनुभवता येणार आहे.

या महिन्यातील पहिल्या पूर्णचंद्राचे दर्शन २ ऑक्टोबरला पहाटे २.३५ वाजता घडले होते. उगवणारा चंद्र लालसर असतो परंतु चंद्र जेव्हा क्षितिजापासून अधिक उंचीवर पोहोचतो तेव्हा पृथ्वीवरील परावर्तित प्रकाशामुळे चंद्र पांढऱ्या रंगाचा दिसतो. त्यात करड्या छटा मिसळल्याने ती नीळसर भासतो. मात्र, ‘ब्ल्यू मून’संदर्भात हा निकष नाही.

वर्षाला १२ पूर्णचंद्र दिसतात, परंतु यंदाच्या वर्षी १३ दिसतील. यापूर्वी ३० जून २००७ रोजी ही घटना घडली होती. त्यानंतर असा योग ३० सप्टेंबर २०५० मध्ये येणार आहे. २०१८ मध्ये ३१ जानेवारी आणि ३१ मार्च अशा दोन दिवशी ‘ब्ल्यू मून’ दिसले होते. आता पुढील ‘ब्ल्यू मून’ ३१ ऑगस्ट २०२३ राेजी दिसेल.

 

टॅग्स :kojagariकोजागिरीkolhapurकोल्हापूर