कोडोलीत कुत्र्याचा हल्ला, मुलगी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:27 IST2021-08-23T04:27:15+5:302021-08-23T04:27:15+5:30

आरोही ही सकाळच्या वेळी अंगणात खेळत असताना पाच ते सहा भटक्या कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला. यावेळी कुत्र्यांनी तिचा हात ...

Kodoli dog attack, girl injured | कोडोलीत कुत्र्याचा हल्ला, मुलगी जखमी

कोडोलीत कुत्र्याचा हल्ला, मुलगी जखमी

आरोही ही सकाळच्या वेळी अंगणात खेळत असताना पाच ते सहा भटक्या कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला. यावेळी कुत्र्यांनी तिचा हात तोंडात धरून फरपटत नेले. तिची आई आणि शेजाऱ्यांंनी आरोहीची कुत्र्यापासून सुटका केली. यावेळी ती गंभीर जखमी झाली. येथील मटन मार्केट, हॉटेल व इतर काही ठिकाणी कुत्र्यांची टोळकी नेहमी बसून असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी मटन मार्केट, हॉटेल काही दिवस बंद होती. त्यामुळे या कुत्र्यांनी खाण्यासाठी काही तरी मिळेल म्हणून त्यांचा मोर्चा गावातील विविध गल्लीत वळविला आहे. सध्या भटक्या कुत्र्यांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी कारवाई केली जात नसल्याने त्यांची संख्या देखील मोठी आहे. कुत्र्यांची टोळकी मार्केट परिसरात नेहमी बसून असतात. त्यामुळे रात्री-अपरात्री या भागातून जाणे धोक्याचे झाले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Web Title: Kodoli dog attack, girl injured