शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

‘गुड टच- बॅड टच’ कळेल तर मुलांचे लैंगिक शोषण टळेल!, पालकांची भूमिका महत्त्वाची

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 13:40 IST

पालकांचे मुलांसोबतचे नाते अतिशय घट्ट असणे आवश्यक आहे. या गोष्टी मुलांना समजावून सांगितल्यास मुलांचा आत्मविश्वास वाढेल व लैंगिक शोषणालाही आळा बसेल.

तानाजी पोवारकोल्हापूर : सध्या लैंगिक अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे, त्यातच अल्पवयीन मुलांवरीलही वाढते अत्याचार ही गंभीर समस्या बनली आहे. त्यासाठी मुलांना ‘गुड टच आणि बॅड टच’ समजावून सांगण्याची जबाबदारी आता पालकांवर आली आहे. त्यासाठी पालकांचे मुलांसोबतचे नाते अतिशय घट्ट असणे आवश्यक आहे. या गोष्टी मुलांना समजावून सांगितल्यास मुलांचा आत्मविश्वास वाढेल व लैंगिक शोषणालाही आळा बसेल. वर्षभरात लैंगिक अत्याचार व विनयभंगाच्या प्रमाणात वाढ झाली आहे.पालकांनी आपल्या मुलांना विश्वासात घेऊन काही गोष्टींचा उलगडा केल्यास अत्याचाराच्या प्रकाराला निश्चितच आळा बसेल. मुलांच्या सुरक्षेसाठी खरे तर पालकांनीच पावले उचलणे आवश्यक आहे. पालकांनी अशा गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास कालांतराने पश्चात्तापाशिवाय हाती काहीच उरत नाही. त्यामुळे सध्या पालकांनी मुलांबाबत सतर्कता बाळगण्याची गरज आहे. लहान मुलांवर वाईट नजर ठेवणारा व्यक्ती हा गुन्ह्याची सुरुवात वाईट स्पर्शापासूनच करतो. तोच स्पर्श मुलांना समजण्याची आवश्यकता आहे. त्याबाबत मुले अवगत असतील तर या घटना टाळता येतात.‘गुड टच’ची माहिती आवश्यकएखादी व्यक्ती ही तुमच्या अंगाला स्पर्श करते, त्यातून प्रेमाची भावना व्यक्त होते, त्यावेळी चांगले वाटते, तो स्पर्श सुरक्षित वाटतो, असा स्पर्श चांगला समजावा. मुलांना या गोष्टीचे ज्ञान देण्याची जबाबदारी पालकांची आहे. वेळप्रसंगी त्यांना स्पर्श करून दाखवा. एखाद्या व्यक्तीचा स्पर्श त्रासदायक वाटत असेल तर त्यापासून बाजूला व्हावे.‘बॅड टच’ समजावून सांगावेत‘गुड टच’च्या विरोधात ‘बॅड टच’ असतो. एखाद्याने स्पर्श केला तर त्याचा त्रास होतो अगर वाईट वाटते, तो स्पर्श ‘बॅड टच’ समजावा. मुलांना विश्वासात घेऊन असे ‘बॅट टच’ नीट समाजावून सांगावेत. आपल्या काही खासगी अवयवांना चांगला व्यक्ती कधीही स्पर्श करत नाही, अशा अवयवांची माहिती मुलांना समजावून सांगताना पालकांनी लाज बाळगू नये; पण त्यांना ही माहिती विश्वासात घेऊनच सांगावी.

२०२१ मधील अत्याचार

  • एकूण लैंगिक अत्याचार - १७८
  • अल्पवयीनवरील अत्याचार - ८४
  • एकूण विनयभंग - ३४९
  • अल्पवयीनवर अत्याचार - १७०
टॅग्स :kolhapurकोल्हापूरsexual harassmentलैंगिक छळ