शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

लोकसभेची रणधुमाळी: कोल्हापूर जिल्ह्यातील नेतेमंडळींचा दिनक्रम कसा..जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 16:23 IST

निवडणूक प्रचारामुळे नेहमीच्या दिनचर्येला बगल, 'स्टॅमिना'चे सर्वसामान्यांना कुतहूल

कोल्हापूर : निवडणुकीच्या व्यतिरिक्त काळात नेत्यांवर इतरांचे वेळापत्रक अवलंबून असते. परंतु, आता लोकसभा निवडणुकीच्या प्रचार काळात नेत्यांचे वेळापत्रक बदलले आहे. त्यांच्या सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंतच्या आणि खाण्याच्या वेळाही बदलल्या आहेत. हे नेते काय खातात आणि इतका ‘स्टॅमिना’ कसा ठेवतात याचे कुतूहल सर्वसामान्यांना असते.एरवी सकाळी आपल्या वेळेनुसार उठणे, व्यायाम, वर्तमानपत्रांचे वाचन, नाश्ता करून निवांत कार्यक्रम, शासकीय बैठका, मतदारसंघातील कार्यक्रम, खासदारांचा दिल्ली, तर आमदारांचा मुंबई दौरा, मतदारसंघातील विवाह समारंभ, सांत्वनपर भेटी असा नेत्यांचा कार्यक्रम असतो. परंतु, आता प्रचाराच्या धामधुमीत हे वेळापत्रक बदलले आहे. ११ ते ५ या वेळेत ऊन भाजून काढत असल्याने याचा विचार करूनच नेते आपला दिनक्रम ठरवत आहेत. त्यांच्या या बदललेल्या दिनक्रमाविषयी.

शाहू छत्रपतीशाहू छत्रपती सकाळी सात वाजताच उठतात. वर्तमानपत्रांचे वाचन करून, आवरून आवश्यकतेनुसार साडेआठ, नऊला बाहेर पडतात. पण, पोटभर नाश्ता करूनच. प्रचारादरम्यान दुपारी घरी येणार नसतील तर सोबत पराठे, ठेपला, फळं, ड्रायफूट दिले जाते. परंतु, एकदा का भागात गेले की मग अनेकदा तेथे कार्यकर्त्यांनी जेवणाची सोय केली तर तिथेच जेवतात. रात्री अकरानंतर वाड्यावर आले की सर्वजण दिवसभराचा आढावा घेतात. रात्री एखादा गोड पदार्थ त्यांना खायला आवडतो.हसन मुश्रीफयांचा दिवस सकाळी सहाला सुरू होतो. सातनंतर त्यांचा जनता दरबार सुरू होतो. सकाळी चहा घेऊन बाहेर पडतात. नाश्ता नाही. गाठीभेटी, नियाेजन बैठका आवरून दुपारी भाजी-भाकरीचे जेवण. दुपारचे जेवण वेळ पडेल तसे आणि तिथे. चहा मात्र नाही म्हणत नाहीत. रात्री दहापर्यंत मेळावे आवरून घरी जेवायला. रात्री झोपायला किमान साडेअकरा होतात.

धनंजय महाडिकसकाळी पावणेसहाला उठायची यांची सवय. व्यायाम अजिबात चुकवत नाहीत. पोटभर नाश्ता करून ९ नंतर बाहेर पडतात. दुपारचं जेवण घरी किंवा भागात असेल तर तिथे. महाडिक हे कोल्हापूर, हातकणंगले आणि सातारा मतदारसंघाचे क्लस्टरप्रमुख असल्याने तिकडचे फोनही सुरू असतात. पक्षीय दौऱ्याचे नियोजनही त्यांना करावे लागते. दिवसभराचे कामकाज आवरून रात्री दहा ते अकरापर्यंत घरी. जेवण झाल्यानंतर रात्री साडेबारा-एकपर्यंत ते सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात.सतेज पाटीलसकाळी आठपर्यंत आवरून तयार असतात. भरपेट नाश्ता करून बाहेर पडतात. दिवसभराचा यांचा कार्यक्रम ठरलेला असतो. गरज असेल तर गाडीत दुपारचा डबाही घेतला जातो. कोल्हापुरात असतील तर घरी, भागात असतील तर कार्यकर्त्यांसमवेत जेवण घेतात. दिवसभर यांचा बराच कालावधी फोनवर जातो. राज्यातील काॅंग्रेस नेत्यांपासून ते आजरा, चंदगडच्या कार्यकर्त्यांपर्यंत हे फोन सुरू असतात. रात्री कितीही उशीर झाला तरी दिवसभरातील ठरलेली कामे पूर्ण करूनच परतायची यांची पद्धत. सोशल मीडिया पाहण्यासाठी आवर्जून वेळ देतात.

पी.एन. पाटीलसकाळी साडेनऊ वाजता नाश्ता करून बाहेर पडतात. सध्या ते शाहू छत्रपती यांच्या प्रचारात आहेत. दुपारच्या जेवणाची सोय कार्यकर्त्यांनी केलेली असते. रात्री १० ला प्रचार संपवून घरी. मग जेवण. चहा अजिबात घेत नाहीत. भागात फिरताना फोनवरूनच कार्यकर्त्यांना सूचना देण्याचे काम सुरू असते.संजय मंडलिकसकाळी उठून वर्तमानपत्रांचे वाचन, नाश्ता करून मंडलिक बाहेर पडतात. आदल्या दिवशीच दौरा ठरलेला असतो. त्यामुळे ते तालुक्यांना जाण्यासाठी लवकरच बाहेर पडतात. जेवण ज्या त्या ठिकाणी आणि असेल ते. जेवणाखाण्याबाबत त्यांचा फारसा कोणता आग्रह नसतो. सध्या तेच उमेदवार असल्याने रात्री ११ नंतरच त्यांचे घरी येणे होत आहे.

राजू शेट्टीहे सकाळी नऊनंतर न्याहारी करून बाहेर पडतात. सकाळी भाजी-भाकरीलाच त्यांचे प्राधान्य असते. चळवळ करताना नेहमीच हातावर भाकरी घेऊन खाण्याची सवय असल्याने शेट्टी यांच्या दुपारच्या जेवणाची सोय कार्यकर्तेच करतात. दिवसभर गाठीभेटी, बैठका, मेळावे आवरून रात्री १० पर्यंत घरी येतात. मग जेवण असा त्यांचा दिनक्रम आहे.

धैर्यशील मानेफिटनेसबाबत नेहमीच दक्ष असलेले धैर्यशील माने सध्या लवकर उठून आवरून बाहेर पडत आहेत. सकाळी नाश्ता करून बाहेर पडलेले माने भागातच जेवण घेऊन पुढच्या गाठीभेटींना जात आहेत. ते जरी कोल्हापुरात राहत असले तरी रात्री ११ पर्यंत ते मतदारसंघात राहत आहेत.

सत्यजित पाटीलकोल्हापुरात देवकर पाणंदीत राहायला असो की सरुडमध्ये प्रकृतीबद्दल कमालीचे जागरूक असलेल्या सत्यजित पाटील यांचा सध्या रोजचा प्रचार हाच व्यायाम आहे. पहाटे पाच वाजता त्यांचा दिवस सुरू होतो. सकाळी भाजी-भाकरी आणि एक सफरचंद हेच त्यांचे जेवण. दिवसभर काहीच घेत नाहीत. रात्री थेट जेवणच. एक शीतही भात खात नाहीत. सोशल मीडीयापासून अलिप्त. टेनिसचे सामने आणि कुटुंबासह चित्रपट पाहायला जाणे त्यांना आवडते. रात्री कितीही वाजता झोपले तरी सकाळी उठायचा नेम चुकत नाही.

डी. सी. पाटील 

‘वंचित’चे उमेदवार डी. सी. पाटील हे सकाळी साडेआठच्या सुमारास बाहेर पडतात. सध्या त्यांनी नातेवाईक, पै पाहुणे आणि मित्रपरिवाराच्या भेटी सुरू ठेवल्या आहेत. सकाळीच न्याहरी करून बाहेर पडणारे पाटील बाहेर फारसे खात नाहीत. रात्रीच घरी येऊन जेवण्याला त्यांचे प्राधान्य असते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणElectionनिवडणूक