शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरीक, लहान मुलांना तात्पुरता प्रवेश बंद; के.एम.टी. ची बससेवा टप्याटप्याने सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 17:22 IST

बसमधून ज्येष्ठ नागरीक व लहान मुलांना तात्पुरता प्रवेश बंद करणेत आला आहे. सर्व चालकवाहकांना डयुटीवर असताना हँडग्लोज व मास्क बंधनकारक केले आहे.

ठळक मुद्देप्रवाशांना बसमध्ये मास्क वापरणे आणि सोशल डिस्टनसींगचे पालन करणे बंधनकारक आहे.

कोल्हापूर  : करोना विषाणू प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये के.एम.टी. उपक्रमाची बससेवा बंद करणेत आली होती. सेवा सुरु करणेबाबत प्रवासी, सामाजिक संघटना यांनी मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने के.एम.टी. बससेवा सुरु करणेत सशर्त परवानगी दिली आहे.दि.01/06/2020 पासून के.एम.टी.ची बससेवा अंशत: प्रथम 8 मार्गांवर सुरु करणेत येत असून, त्यानंतर टप्याटप्याने उर्वरित मार्गांवर बससेवा सुरु करणेचे नियोजन आहे. पहिल्या टप्यामध्ये श्री शाहू मैदान बस नियंत्रण केंद्र ते मार्केट यार्ड, श्री शाहू मैदान बस नियंत्रण केंद्र ते विवेकानंद कॉलेजमार्गे शुगरमील, गंगावेश ते एस.टी.स्टँड, छ.शिवाजी चौक ते कळंबा, छ.शिवाजी चौक ते क्रां.नानापाटीलनगर, छ.शिवाजी चौक ते बोंद्रेनगर, तसेच छ.शिवाजी चौक ते जरगनगरमार्गे आर.के.नगर गणपती मंदिर व छ.शिवाजी चौक ते राजारामपुरीमार्गे आर.के.नगर गणपती मंदिर या मार्गांवर एकूण 10 बसेसद्वारे सकाळी 7.00 ते सायं.7.00 पर्यंत बससेवा उपलब्ध करुन देणेत येणार आहे. बसमधून 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरीक व 10 वर्षाखालील लहान मुलांना तात्पुरता प्रवेश बंद करणेत आला आहे. सर्व चालक/वाहकांना डयुटीवर असताना हँडग्लोज व मास्क बंधनकारक केले आहे. तिकीट देणेपुर्वी वाहकाकडून प्रत्येक प्रवाशाला सॅनिटाईजर देणेत येईल. या बसेस वेळापत्रकाप्रमाणे धावणार नसून, उपलब्ध मार्गांवर किमान प्रवासी उपलब्ध झालेस नियंत्रण केंद्रावरुन बस सोडणेत येईल.या मार्गावरील सर्व बसेस प्रत्येक फेरीनंतर निर्जंतुकीकरण करणेत येणार असून प्रत्येक बसमधून किमान 20 ते 22 प्रवाशांना प्रवास करता येईल. प्रवाशांना बसमध्ये मास्क वापरणे आणि सोशल डिस्टनसींगचे पालन करणे बंधनकारक आहे.सर्व प्रवाशी नागरीकांनी स्वत:च्या सुरक्षिततेसाठी मास्क व सोशल डिस्टनसींगचे वापर करुन के.एम.टी. उपक्रमास सहकार्य करावे असे आवाहन परिवहन समिती सभापती सौ. प्रतिज्ञा महेश उत्तुरे व अति. परिवहन व्यवस्थापक सुभाषचंद्र देसाई यांनी केले आहे.

टॅग्स :Bus Driverबसचालकkolhapurकोल्हापूर