शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

केएमटी बस आता बायो सीएनजीवर धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 11:35 IST

Muncipal Corporation, kolhapurnews, bus, biocng केएमटीच्या बस आता बायो सीएनजीवर धावणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर एक बसचे इंजिन सीएनजीप्रमाणे करण्यात येत आहे. संबंधित कंपनीसोबत करार केला असून, सोमवारी एका बसचे इंजिन गॅस रूपांतरित करण्यासाठी देण्यात आले.

ठळक मुद्देप्रायोगिक तत्त्वावर एक बस तयार करणार गॅस इंजिन करण्यासाठी संबंधित कंपनीकडे, एका बसचे इंजिन हस्तांतर

कोल्हापूर : केएमटीच्या बस आता बायो सीएनजीवर धावणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर एक बसचे इंजिन सीएनजीप्रमाणे करण्यात येत आहे. संबंधित कंपनीसोबत करार केला असून, सोमवारी एका बसचे इंजिन गॅस रूपांतरित करण्यासाठी देण्यात आले.बायो सीएनजी रूपांतरित करण्यासाठी एक बस संबंधित कंपनीकडे हस्तांतरित करण्याची कार्यवाही महापौर निलोफर आजरेकर यांच्या हस्ते करण्यात आली. इंधन खर्चामध्ये बचत आणि पर्यावरण संवर्धन असा दुहेरी फायदा होणार आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास अन्य बसेस रूपांतरित करण्यात येणार आहेत.

यावेळी उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती सचिन पाटील, परिवहन समिती सभापती प्रतिज्ञा उत्तुरे, परिवहन समिती सदस्य अशोक जाधव, शेखर कुसाळे, चंद्रकांत सूर्यवंशी, महेश वासुदेव, यशवंत शिंदे, नामदेव नागटिळे, संदीप सरनाईक, प्रसाद उगवे उपस्थित होते.प्रवाशांच्या मनोरंजनासाठी बसमध्ये एलईडी टीव्हीजाहिरातीद्वारे उत्पन्नाचे स्रोत निर्माण व्हावेत यासाठी एलईडी टीव्हीद्वारे प्रवाशांचे मनोरंजन करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर दोन बसेसमध्ये एलईडी टीव्ही बसविण्यात आले. परिवहन समिती सभापती प्रतिज्ञा महेश उत्तुरे यांच्या संकल्पनेतून बायो सीएनजी आणि एलईडी टीव्ही हे दोन्ही उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. केएमटीचा तोटा कमी करून फायदा कसा होईल, यासाठी हे प्रकल्प सुरू केले जात आहेत.प्रशिक्षण केंद्रास सुभाष देसाईंचे नावयंत्रशाळेमधील कर्मचारी प्रशिक्षणगृहास माजी अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक आणि मोटार वाहन निरीक्षक सुभाषचंद्र नारायण देसाई यांचे नाव देण्यात आले. सुभाषचंद्र नारायण देसाई के.एम.टी. प्रशिक्षण केंद्र असे नामकरण महापौर निलोफर आजरेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूरstate transportएसटी