शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सवाचा आज समारोप

By admin | Updated: September 21, 2014 00:52 IST

कोल्हापूर : ‘प्रयत्न छोटा बदल मोठा’ या ब्रीदवाक्याने सुरू झालेल्या

कोल्हापूर : ‘प्रयत्न छोटा बदल मोठा’ या ब्रीदवाक्याने सुरू झालेल्या आणि गेली तीन दिवस पर्यावरणाचा जागर केलेल्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्या, रविवारी समारोप होत आहे. शाहू स्मारक भवनमध्ये आयोजित महोत्सवांतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण सकाळी ११ वाजता होणार आहे. मराठी रंगभूमीचा इतिहास मांडणाऱ्या ‘नांदी’ या नाटकातील कलाकार शरद पोंक्षे, अविनाश नारकर, अश्विनी एकबोटे यांच्या हस्ते हे पारितोषिक दिले जातील. महोत्सव समारोपाचा कार्यक्रम संध्याकाळी पाच वाजता होणार आहे. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दत्ता शिंदे यांच्या हस्ते डॉ. जय सामंत यांना वसुंधरा सन्मान हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. यानंतर टील्डा स्वींटन दिग्दर्शित ‘बॉर्न आॅफ फायर’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन चंद्रकांत जोशी, दिलीप बापट यांनी केले आहे. महोत्सवात शनिवारी हातकणंगले तालुक्यातील कोंडिग्रे येथील निर्यातदार शेतकरी गणपतराव पाटील यांच्या हरितगृहाला निसर्गप्रेमींनी भेट दिली. दुपारी शाहू स्मारक भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमात ‘ई-कचरा व्यवस्थापन’ या विषयावर मनोज मेहता यांनी मार्गदर्शन केले. संगणक व अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वाढत्या वापरामुळे निर्माण झालेल्या समस्या मांडताना त्यांनी ई-कचऱ्याचा पुनर्वापर, या कचऱ्यापासून बनविण्यात येणाऱ्या वस्तुंचीही माहिती दिली. यानंतर राणिता चौगुले यांनी फुले, पाने, फळे यांच्यापासून रंग तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. बाजारात मिळणारे खाण्याचे रंग, रंगपंचमीला वापरले जाणारे रंग यामध्ये रासायनिक द्रव्ये असल्याने शरीरावर घातक परिणाम होतात. मात्र हे नैसर्गिक रंग दर्जेदार, टिकाऊ आणि आरोग्यपूर्ण असतात. त्यामुळे त्यांचा वापर खाद्यपदार्थांपासून ते कपडे, चित्र रंगवणे, रंगीबेरंगी रांगोळी तयार करण्यापर्यंत करता येतो. (प्रतिनिधी)