किणी विद्यालयाने अनाथांना घेतले दत्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:26 AM2021-01-25T04:26:12+5:302021-01-25T04:26:12+5:30

चंदगड : किटवाड (ता. चंदगड) येथील अनाथ विद्यार्थी कुणाल किसन बिरजे याला किणीच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण ...

Kini Vidyalaya adopts orphans | किणी विद्यालयाने अनाथांना घेतले दत्तक

किणी विद्यालयाने अनाथांना घेतले दत्तक

Next

चंदगड : किटवाड (ता. चंदगड) येथील अनाथ विद्यार्थी कुणाल किसन बिरजे याला किणीच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण संस्था संचलित जयप्रकाश विद्यालयाने दत्तक घेतले. त्याच्या दहावीपर्यंतच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी विद्यालयाने उचलली आहे. कुणालच्या आई-वडिलांच्या निधनामुळे तो व त्याची बहीण कोमल निराधार झाले आहेत.

चंदगड पं. स. चे शिक्षण विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे यांनी प्रशालेला भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले. मुख्याध्यापक पी. जे. मोहनगेकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मुख्याध्यापक श्रीकांत पाटील, आप्पाराव पाटील, एम. पी. कांबळे, डी. एस. बिर्जे, पी. व्ही. सुतार, व्ही. एम. बारड यांच्यासह एस. के. पाटील, पी. एन. तरवाळ, ए. जे. कुंभार, पी. एस. कुंभार, मनीषा मनवाडकर आदी उपस्थित होते.

Web Title: Kini Vidyalaya adopts orphans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.