शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

निपाणीतील ‘तो’ खून केवळ चैनीसाठी मित्रासह तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 00:55 IST

अरविंद पोळ यांच्या खुनाच्या घटनेने आता वेगळेच वळण घेतले आहे. सुरुवातीला प्रेमप्रकरणात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून हा खून झाल्याची माहिती पोलिसांनी

ठळक मुद्देदागिन्यांसाठी आरोपींचे कृत्य

निपाणी : अरविंद पोळ यांच्या खुनाच्या घटनेने आता वेगळेच वळण घेतले आहे. सुरुवातीला प्रेमप्रकरणात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून हा खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली होती; पण मंगळवारी जिल्हा पोलीसप्रमुख सुधीरकुमार रेड्डी यांनी या प्रकरणाची चौकशी केली असता हा खून केवळ चैनीसाठी झाल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी निपाणी पोलिसांनी सतीश शहाजी क्षीरसागर, रवी इराना शिरगावे व सौरभ अजित अथणी (२१, शिवाजीनगर, निपाणी) या अरविंदच्या मित्रांना अटक केली आहे.दरम्यान, खणीत टाकलेला अरविंदचा मृतदेह सोमवारी दिवसभर न सापडल्याने संध्याकाळी शोधमोहीम थांबविण्यात आली होती; पण मंगळवारी दिनकर कांबळे यांनी अथक प्रयत्न करून ४0 फूट खोल जाऊन मृतदेह बाहेर काढला.

या प्रकरणाची माहिती अशी की, रविवारी दुपारी संशयित सतीश याने आपला मित्र अरविंद गौरीशंकर पोळ याला पार्टी करूया असे सांगून पांगीर येथील आपल्या आजीच्या घरात बोलावून घेतले. तेथे संशयित सौरभ व रवी यांच्या मदतीने त्याचा खून केला होता. यानंतर या तिघांनी अरविंदचा मृतदेह नांगनूर गावच्या हद्दीतील खणीत टाकला होता. प्रकरण उघडकीस आल्यावर या संशयितांनी पोलिसांना हा खून प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याच्या रागातून सुपारी देऊन झाल्याचे सांगितले होते; पण सोमवारी रात्री त्यांनी नवीनच माहिती दिली. सतीश व अरविंद हे मित्र होते. अरविंद हा नेहमी दागिने घालून फिरत असे. त्याच्या दागिन्यातून चांगले पैसे मिळतील या विचाराने सतीशने मित्र रवी व सौरभच्या मदतीने हातोडीने वार करून खून केला. दागिने बंगलोर येथे विकायचे व त्या पैशातून चैनी करायची असे त्यांनी ठरवले होते, असे तपासात पुढे आले आहे.मृताच्या डोक्यात पाच वारदरम्यान, तासाभराच्या प्रयत्नांनंतर मृतदेह खणीतून बाहेर काढून पोलिसांनी पंचनामा केला. यावेळी मृताच्या डोक्यावर हातोडीने मारलेले पाच घाव आढळून आले आहेत. यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर