शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारपासून क्षयरुग्ण शोधमोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 11:44 IST

कोल्हापूर जिल्हा क्षयरोगमुक्त करण्याच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात क्षयरुग्णांची शोधमोहीम सुरू होत आहे. सोमवार (दि. ६)पासून घरोघरी जाऊन अशा प्रकारचे रुग्ण शोधून त्यांच्यावर सरकारी व खासगी दवाखान्यात मोफत उपचार होणार आहेत. १९ मेपर्यंत हा सर्व्हे सुरू राहणार आहे, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा कुंभार यांनी पत्रकार बैठकीत दिली.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात सोमवारपासून क्षयरुग्ण शोधमोहीम६ ते १९ मेपर्यंत चालणार सर्व्हे

कोल्हापूर : जिल्हा क्षयरोगमुक्त करण्याच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात क्षयरुग्णांची शोधमोहीम सुरू होत आहे. सोमवार (दि. ६)पासून घरोघरी जाऊन अशा प्रकारचे रुग्ण शोधून त्यांच्यावर सरकारी व खासगी दवाखान्यात मोफत उपचार होणार आहेत. १९ मेपर्यंत हा सर्व्हे सुरू राहणार आहे, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा कुंभार यांनी पत्रकार बैठकीत दिली.मागील काही काळापासून कार्यक्रमांतर्गत क्षयरुग्णांची नोंदणी होण्याचे प्रमाण कमी होत आहे. फुप्फुसाचा क्षयरोग असणारे बरेचसे रुग्ण, होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे व त्याबाबत डॉक्टरांकडे जाण्याचे टाळत असल्याचे आढळले आहे. त्यामुळेच क्षयरुग्ण शोधमोहीम हाती घेतली आहे.

या अंतर्गत जोखमीच्या भागांमध्ये झोपडपट्टी, स्थलांतरित वस्त्या, औद्योगिक, असंघटित क्षेत्र, वीटभट्टी, दगड फोडणारे, खाण वसाहती, इत्यादी ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांवर जास्त लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यांच्याजवळ पोहोचण्यासाठी दुर्गम भागांमध्ये आरोग्य विभागातील आरोग्य कर्मचारी, ए. एन. एम., एम. पी. डब्ल्यू. आशा कार्यकर्ती हे प्रत्यक्ष जाऊन, घरोघरी भेट देऊन संशयित क्षयरुग्णांची तपासणी करणार आहेत.लक्षणे सापडल्यास मोफत चाचण्या करून, निदान झाल्यास औषधोपचारही सुरू करणार आहेत. उपचार व आहारासाठी प्रत्येक क्षयरुग्णाच्या बँक खात्यामध्ये दरमहा ५०० रुपये जमा होणार आहेत. जिल्ह्यातील जोखमीच्या कार्यक्षेत्रांतील ३ लाख ५५ हजार ५३८ लोकसंख्येची निवड झाली आहे.

३०२ कर्मचारी पथके काम करणार आहेत. पत्रकार परिषदेस क्षय व उरोरोग विभागप्रमुख डॉ. अनिता सैबन्नावर, वैद्यकीय अधिकारी (डी. टी. सी.) डॉ. मानसी कदम, डॉ. विनायक भोई व जिल्हा क्षयरोग केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये २०१८ मध्ये २६१४ नवीन क्षयरुग्ण आढळले. त्यांपैकी ४८१ जणांनी खासगी दवाखान्यांत, तर २१३३ क्षयरुग्णांनी सरकारी रुग्णालयांत उपचार घेतले. जानेवारी ते मार्च २०१९ पर्यंत ६४५ नवे रुग्ण आढळले. त्यांपैकी ११९ खासगीकडे, तर ५२६ रुग्ण सरकारी केंद्रांकडून उपचार घेत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात आजअखेर ३७४ इतके एम डी आर रुग्ण व ३३ एक्स डी आर रुग्ण आढळले आहेत.

क्षयरोगाची लक्षणेदोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीचा खोकला, ताप, छातीत दुखणे, वजनात लक्षणीय घट, थुंकीवाटे रक्त पडणे अशा रुग्णांनी या मोहिमेअंतर्गत मोफत तपासणी करून घ्यावी. तसेच यापूर्वी क्षयरोगाचे उपचार घेतलेल्या रुग्णांनीही आपला बेडका नमुना तपासणीकरिता आरोग्य कर्मचाऱ्यांकडे द्यावा व मोहीम कालावधीमध्ये घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य ती माहिती द्यावी.

 

टॅग्स :Healthआरोग्यkolhapurकोल्हापूर