शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अपहरण करून म्हारूळच्या तरुणाना मारहाण, दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 17:01 IST

उसन्या घेतलेल्या तीन लाख रुपयांसाठी लिहून घेतलेले करारपत्र आणि धनादेश परत मिळविण्यासाठी म्हारूळ (ता. करवीर) येथील तरुणाचे अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी करवीर पोलिसांनी दोघांना अटक केली. संशयित अभिजित जालंदर देशमुख (वय ३०), सुनील रघुनाथ चवरे (३७ दोघेही रा. चाळशिरंबे, ता. कऱ्हाड , जि. सातारा) अशी त्यांची नावे आहेत. अन्य सहा साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. संशयितांनी रमेश संतू कांबळे (३९, रा. म्हारूळ) यांना डांबून ठेवून जिवे मारण्याची धमकी देत कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या घेतल्या. अंगावरील कपडे काढून जातिवाचक शिवीगाळ करून काठीने मारहाण केली.

ठळक मुद्देअपहरण करून म्हारूळच्या तरुणाना मारहाण, दोघांना अटककऱ्हाड तालुक्यातील चाळशिरंबेतील दोघांना अटक

कोल्हापूर : उसन्या घेतलेल्या तीन लाख रुपयांसाठी लिहून घेतलेले करारपत्र आणि धनादेश परत मिळविण्यासाठी म्हारूळ (ता. करवीर) येथील तरुणाचे अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी करवीर पोलिसांनी दोघांना अटक केली. संशयित अभिजित जालंदर देशमुख (वय ३०), सुनील रघुनाथ चवरे (३७ दोघेही रा. चाळशिरंबे, ता. कऱ्हाड , जि. सातारा) अशी त्यांची नावे आहेत. अन्य सहा साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. संशयितांनी रमेश संतू कांबळे (३९, रा. म्हारूळ) यांना डांबून ठेवून जिवे मारण्याची धमकी देत कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या घेतल्या. अंगावरील कपडे काढून जातिवाचक शिवीगाळ करून काठीने मारहाण केली.करवीर पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी रमेश कांबळे यांनी एप्रिल २०१५ मध्ये संशयित अभिजित देशमुख यांचे वडील जालंदर देशमुख यांना तीन लाख रुपये उसने दिले होते. त्या वेळी कांबळे यांनी देशमुख यांच्याकडून बँकेचा धनादेश आणि करारपत्र लिहून घेतले होते. मात्र जालंदर यांनी घेतलेली रक्कम दिलेल्या मुदतीत परत केली नाही. त्यावेळी कांबळे यांनी त्यांना फोन करून तुमच्याकडून घेतलेला धनादेश बँकेत भरत आहे.

करारपत्राचा भंग केल्याने वकिलांकडून नोटीस पाठवीत असल्याचे सांगितले. संशयित अभिजित आणि सुनील यांना त्याचा राग आला. त्यांनी कांबळे यांच्याकडे धनादेश आणि करारपत्र परत मागितले. मात्र त्यांनी देण्यास नकार दिल्याने त्यांचे अपहरण करण्याचा कट रचला. जबरदस्तीने वाहनात बसवून त्यांचे अपहरण केले. त्यांना कुडित्रे (ता. करवीर), आष्टा, इस्लामपूर, नेर्ले येथे नेऊन एका घरात डांबून ठेवले.

त्या ठिकाणी त्यांना काठीने मारहाण केली. त्यांच्या अंगावरील कपडे काढून जातिवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्याकडून जबरदस्तीने ट्रॅक्टर घेऊन धनादेश, टीटी फॉर्म, करारपत्रावर जबरदस्तीने सह्या घेतल्या. हा प्रकार ३० जुलै ते १ आॅगस्टच्या दरम्यान घडला. अखेर त्यांच्या तावडीतून सुटून त्यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली. पोलीस निरीक्षक सुनील पाटील तपास करीत आहेत. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर