शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

खोची बालिका खून प्रकरण: न्यायालयाचा फैसला, आरोपीस तिहेरी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 12:02 IST

कोल्‍हापूर : खोची (ता. हातकणंगले) येथील सहा वर्षांच्या बालिकेचे अपहरण करून, तिच्यावर लैंगिक अत्याचार करत तिची निर्घृणपणे हत्या प्रकरणी ...

कोल्‍हापूर : खोची (ता. हातकणंगले) येथील सहा वर्षांच्या बालिकेचे अपहरण करून, तिच्यावर लैंगिक अत्याचार करत तिची निर्घृणपणे हत्या प्रकरणी न्यायालयाने आज, सोमवारी निकाल दिला. न्यायालयाने आरोपी बंडा ऊर्फ प्रदीप दिलीप पोवार (वय ३०, रा. खोची) या नराधमाला तिहेरी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. प्रमुख जिल्हा व सत्रन्यायाधीश वृषाली जोशी यांनी ही शिक्षा सुनावली. पश्चिम महाराष्ट्रासह जिल्ह्याचे या निकालाकडे लक्ष लागून होते.नात्याला कलंक लावणारी घटना असल्याने आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी सरकारतर्फे विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव - पाटील यांनी केली होती. खटल्याचा निकाल आज, सोमवारी सुनावण्यात आला. या खटल्यात एकूण २८ साक्षीदार तपासले. आज या खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर खोची परिसरातील ग्रामस्थांनी न्यायालयाच्या आवारात मोठी गर्दी केली होती.दि. ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी खोची येथील सहा वर्षांच्या बालिकेचे घरातून अपहरण करून गावातच निर्जनस्थळी तिच्यावर लैगिक अत्याचार करून तिची क्रूरपणे हत्या केल्याचा आरोप बंडा ऊउर्फ प्रदीप पोवार याच्यावर होता. न्यायालयाने आरोपी पोवारला सर्व खटल्यात दोषी ठरवले.२२५ पानांचे दोषारोपपत्रघटनेनंतर महिन्यातच वडगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक संतोष घोळवे यांनी सखोलपणे तपास करून २२५ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. मार्चपासून अवघ्या १२ कामकाजाच्या सुनावणीत खटल्याचे कामकाज पूर्ण केले. खटल्यात चार साक्षीदार, पंच, घटनास्थळाचा पंचनामा, शवविवच्छेदन अहवाल, आरोपीने कलम २७ खाली दिलेली माहिती, फॉरेन्सिक लॅबचा अहवाल तसेच वस्तुनिष्ठ पुरावे न्यायालयात सादर केले.

घटनाक्रम...

  • ३१ ऑक्टोबर २०२१ - भर दिवसा बालिकेचे अपहरण, लैंगिक अत्याचार, हत्या
  • ३१ ऑक्टोबर - सायंकाळी बालिकेचा मृतदेह मिळाला
  • १ नोव्हेंबर - पहाटे आरोपी बंडा ऊर्फ प्रदीप दिलीप पोवार याला अटक
  • ४ डिसेंबर - आरोपीविरोधात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
  • १७ मार्च २०२२ - मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील उमेशचंद्र यादव-पाटील यांची विशेष सरकारी वकीलपदी नियुक्ती.
  • २२ मार्च - खटल्याची सुनावणी सुरू.
  • २८ मार्च - आरोपीला न्यायालयाने ठरवले दोषी.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरCourtन्यायालय