शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

Khelo India Youth Games 2022: उंच उडीत कोल्हापूरच्या अनिकेत मानेला सुवर्णपदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 18:39 IST

गुजरातमधील नंदियाड येथे थोडक्यात सुवर्णपदक हुकले मात्र खेलो इंडीया मध्ये त्याने चुकांची दुरुस्ती करत एकही फॉल न करता स्वतःचे नवीन रेकॉर्ड तयार केले.

कबनूर : हरियाणा राज्यातील पंचकुला या ठिकाणी सुरू असलेल्या ४ थ्या खेलो इंडीया युथ गेम्स २०२२ या राष्ट्रीय मैदानी क्रीडा स्पर्धेत कोल्हापूरच्या अनिकेत सुभाष माने याने उंचउडीमध्ये सुवर्णपदाची कमाई केली. अनिकेतने नवे रेकॉर्ड आपल्या नावावर करत २.०७ इतकी उंचउडी मारून सुवर्णपदक पटकाविले. अनिकेतच्या विजयाची बातमी समजताच सोनी स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी फटाक्यांची आतषबाजी केली. तसेच कबनूर हायस्कूलच्या मैदानावर गुलालाची उधळण करुन पेढे वाटून आनंद साजरा केला.अनिकेत हरोली तालुका शिरोळ येथील राय या गावचा असून त्याचे शिक्षण कबनूर हायस्कूल येथे पूर्ण झाले. सध्या तो एएससी येथे शिक्षण घेत आहे. कबनूर हायस्कूलमध्ये उंच उडी सरावासाठी संस्थेच्या वतीने सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याने त्याचा सराव चांगल्या पद्धतीने झाला व सुवर्णपदकाचे यश संपादन करता आले.१ सेंटीमीटरने स्वतःचे नवीन रेकॉर्डगुजरातमधील नंदियाड येथे २.०६ मीटर इतकी उंचउडी मारून थोडक्यात त्याचे सुवर्णपदक हुकले व ब्राँझ मेडल मिळाले होते. खेलो इंडीया मध्ये त्याने चुकांची दुरुस्ती करत एकही फॉल न करता २.०७ मीटर इतकी उंचउडी मारत १ सेंटीमीटरने स्वतःचे नवीन रेकॉर्ड तयार केले. देशातील अनेक नामवंत वेगवेगळ्या राज्यातील खेळाडूंचे आव्हान मोडून काढत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राला पदक तक्त्यात १ सुवर्णपदक मिळवून दिले.सुवर्णपदक विजेत्यांना भारत सरकारची स्कॉलरशिपखेलो इंडिया मधील सुवर्णपदक विजेत्यांना भारत सरकारची पाच लाख रुपयेची स्कॉलरशिप जाहिर झाली आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने खेलो इंडीया गोल्डमेडल विजेत्या खेळाडूला तीन लाख रुपयाचे बक्षीस तर सिल्वर मेडल विजेत्या खेळाडूला दोन लाख रुपयाचे बक्षीस व ब्राँझ मेडल विजेत्या खेळाडूला एक लाख रुपयाचे बक्षीस जाहिर केले आहे.गेली चार वर्षे सरावअनिकेतला सुरवातीपासून क्रीडा शिक्षक सुभाष माने यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या गेली चार वर्षे तो सराव करत आहे. सध्या तो बेंगलोर या ठिकाणी भारतीय ऑलम्पिक खेळाडू साहना कुमारी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय खेल प्राधिकरण, साई सेंटर मध्ये सराव करतो आहे.  एएससी कॉलेजचे प्रा.मेजर मोहन वीरकर व प्राचार्य यांचे प्रोत्साहन मिळत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKhelo Indiaखेलो इंडिया