शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पोषक पावसामुळे खरीप जोमात, माळरानावरील पिके तरारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 10:57 IST

कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पिकांना हवा तसाच पाऊस पडत असल्याने खरीप पिके चांगलीच तरारली आहेत. विशेष म्हणजे मध्यंतरीच्या खडखडीत उन्हानंतर पाऊस झाल्याने माळरानावरील पिके जोमात आहेत. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

ठळक मुद्देपोषक पावसामुळे खरीप जोमात, माळरानावरील पिके तरारली मुसळधार पावसाचा अंदाज

कोल्हापूर : जिल्ह्यात सध्या पिकांना हवा तसाच पाऊस पडत असल्याने खरीप पिके चांगलीच तरारली आहेत. विशेष म्हणजे मध्यंतरीच्या खडखडीत उन्हानंतर पाऊस झाल्याने माळरानावरील पिके जोमात आहेत. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यातील अतिवृष्टीनंतर पावसाने काहीशी दडी मारली होती. आठवडाभर दांडी मारल्याने शेतकरी अडचणीत आला होता. अगोदरच नदी व ओढ्याकाठची पिके महापुराने उद्ध्वस्त झाली आहेत. पुराच्या पाणी व अतिवृष्टीच्या तडाख्यातून राहिलेल्या पिकांची जोपासना करण्यात सध्या शेतकरी मग्न आहे.

मध्यंतरी पावसाने दडी मारली व वीज कनेक्शन बंद असल्याने पाणी पाजायचे कसे? असा पेच होता. तोपर्यंत पावसाने सुरुवात केली. पावसाच्या हलक्या सरी का असेना पण दिवसातून दोन-तीनवेळा कोसळत राहिल्याने तेवढा पिकांना आधार झाला होता. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा नूर काहीसा बदलला आहे.करवीरचा पश्चिम भाग, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, चंदगड, आजरा, भुदरगड तालुक्यांत चांगला पाऊस होत आहे. सध्या भातपीक गळ्यात (परिपक्वतेकडे) आले आहेत तर कमी कालावधीचे भात बाहेर पडले आहे. नागली, भुईमूग, सोयाबीन पिकांचीही तीच अवस्था असून त्यांना पाण्याची गरज आहे. या पिकांना हवी तेवढीच ओल मुळांना मिळत असल्याने पिके चांगलीच फोफावली आहेत.दरम्यान, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत पाऊस वाढण्याची शक्यता आहे.आणखी १५-२० दिवस गरजखरीप पिकांना अजून १५ ते २० दिवस पावसाची गरज आहे. आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून भात, भुईमूग, सोयाबीन काढणीस सुरुवात होईल.-धरणातील विसर्ग वाढलाधरणक्षेत्रातही चांगला पाऊस सुरू आहे. त्यामुळे सर्वच धरणांतील विसर्ग वाढविण्यात आला आहे. राधानगरीतून प्रतिसेकंद ८०० वरून १४००, वारणातून २६४७ वरून ५४६०, दूधगंगेतून ८०० वरून ९०० घनफूट पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे.नऊ बंधारे पाण्याखालीधरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांची पाणी पातळी वाढत आहे. पंचगंगेची पातळी सोमवारी सकाळी आठपर्यंत १८ फुटांवर होती. त्यामुळे विविध नद्यांवरील नऊ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

पिकांना हवा तसाच पाऊस सुरू असल्याने सर्वच पिकांची वाढ चांगली आहे. मध्यंतरी अतिवृष्टीने वाढ खुंटलेल्या ऊस पिकालाही पाऊस पोषक आहे.- सुरेश खाडे शेतकरी, चव्हाणवाडी  

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर