शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्वच्छता अभियानात खानापूर ग्रामपंचायत कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 12:25 IST

गोलिवडे द्वितीय, तर हिरलगे ग्रामपंचायत तृतीय

आजरा : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत खानापूर (ता. आजरा) ग्रामपंचायतीने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळविला आहे. स्पर्धेत गोलिवडे (ता. पन्हाळा) व हिरलगे (ता. गडहिंग्लज) यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे. जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परीट यांनी याबाबतचे पत्र दिले आहे.पाणी व स्वच्छता विभागाच्या प्रकल्प संचालक माधुरी परीट यांच्या अध्यक्षतेखाली कमिटीने जिल्ह्यातील १२ तालुक्यातील प्रत्येकी दोन गावांची या स्पर्धेसाठी तपासणी केली होती. २०० गुणांच्या या परीक्षेत खानापूर १९०, गोलिवडे १८३, हिरलगे ग्रामपंचायतीला १६२ गुण मिळविले. स्व. वसंतराव नाईक यांच्या नावाने दिला जाणारा सांडपाणी व्यवस्थापनाचा ५० हजार रुपये व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापनाचा ५० हजार रुपयांचा पुरस्कारही खानापूर ग्रामपंचायतीला मिळाला आहे. स्व. आबासाहेब खेडकर यांच्या नावाने दिला जाणारा शौचालय व्यवस्थापनाचा गोलिवडे ग्रामपंचायतीला ५० हजारांचा पुरस्कार मिळाला आहे.जिल्हास्तरीय समितीमार्फत ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडी, गावातील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय, शालेय शौचालय, गावातील परिसर यांची पाहणी करण्यात आली होती. खानापूर ग्रामपंचायतीने यामध्ये प्रथम क्रमांक मिळविला असून, सहा लाखांचे बक्षीस मिळविले आहे. विशेष दोन पुरस्कारांचे प्रत्येकी ५० हजार असे एक लाखाचे बक्षीस मिळाले आहे.याकामी सरपंच संकल्पना डोंगरे, उपसरपंच आनंदा राणे, ग्रामसेवक विशाल दुंडगेकर, सदस्य विश्वास जाधव, युवराज जाधव, माधुरी गुरव, अलका चव्हाण, सुशिला जाधव, सीताबाई दोरुगडे यांनी विशेष परिश्रम घेतले. गटविकास अधिकारी संजय ढमाळ, पंचायत विस्तार अधिकारी बी. टी. कुंभार, आबासाहेब मासाळ यांनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायत