शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामरोजगार सेवकांतर्फे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 16:35 IST

ग्रामरोजगार सेवकांना महिन्याला इतर राज्यांप्रमाणे १८००० हजार रुपये वेतन मिळावे, यासह विविध मागण्यांकरीता महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार सेवक संघातर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्यांचा लवकरात लवकर विचार न झाल्यास सोमवारी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

ठळक मुद्देग्रामरोजगार सेवकांना १८ हजार वेतन द्यावेकोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

कोल्हापूर : ग्रामरोजगार सेवकांना महिन्याला इतर राज्यांप्रमाणे १८००० हजार रुपये वेतन मिळावे, यासह विविध मागण्यांकरीता महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार सेवक संघातर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्यांचा लवकरात लवकर विचार न झाल्यास सोमवारी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.संघाच्या जिल्हाध्यक्षा शुभांगी पोवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील सदस्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. आपल्या मागण्यांसंदर्भात जोरदार घोषणाबाजी करुन प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, महाराष्ट्रात  १९७२ ‘रोहयो’ सुरु झाली.  केंद्र सरकारने २००५ मध्ये इतर राज्यात अंमलबजावणी केली.परंतु २००५ च्या कायद्याप्रमाणे अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र शासन अपयशी ठरले आहे.

यामध्ये सुधारणा व्हावी. ग्रामरोजगार सेवकांना किमान वेतन १८ हजार रुपये द्यावे, हे वेतन संबंधितांच्या वैयक्तिक खात्यावर जमा करावे, ‘मनरेगा’ ही स्वतंत्र यंत्रणा करण्यात यावी, ग्रामरोजगार सेवकांना पूर्णवेळ शासकिय सेवेत सामावून घ्यावा अशा विविध मागण्यांचा विचार करुन शासनाने न्याय द्यावा.आंदोलनात दादू सावंत, युवराज पाटील, चंद्रकांत पाटील, तानाजी पाटील, अनिल ईर, हसन मुल्लाणी, बाळासो कांबळे, दयानंद सपकाळ, प्रदीप पाटील आदींचा सहभाग होता.

  

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर