शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पोलंडवासीयांच्या आठवणींचा ठेवा संग्रहालय रूपात, वर्षभरात होणार साकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 11:50 IST

कोल्हापूर : दुसऱ्या महायुद्धावेळी, हिटलरच्या अमानुष छळापासून वाचण्यासाठी कोल्हापूर संस्थानच्या आश्रयाला आलेल्या पोलंडवासीयांच्या आठवणींचा ठेवा संग्रहालय रूपात जतन करण्यात ...

ठळक मुद्देपोलंडवासीयांच्या आठवणींचा ठेवा संग्रहालय रूपात, वर्षभरात होणार साकार

कोल्हापूर : दुसऱ्या महायुद्धावेळी, हिटलरच्या अमानुष छळापासून वाचण्यासाठी कोल्हापूर संस्थानच्या आश्रयाला आलेल्या पोलंडवासीयांच्या आठवणींचा ठेवा संग्रहालय रूपात जतन करण्यात येणार आहे. पोलंडवासियांच्या वास्तव्याच्या काळातील वस्तू, छायाचित्रे या संग्रहालयात ठेवण्यात येणार असून, याद्वारे भारत-पोलंडच्या मैत्रीचे नाते अधिक दृढ होणार आहे.

दुसऱ्या महायुद्धा दरम्यान अनेक देशांनी निर्वासित पोलंडवासीयांसाठी आश्रय देण्याचे नाकारले मात्र भारतात मात्र जामनगर आणि कोल्हापूर संस्थानने त्यांना आश्रय दिला. पोलंडच्या लोकांसाठी कोल्हापूर संस्थानामार्फत कोल्हापूरपासून ५ किमी अंतरावर वळिवडे कॅम्प म्हणजे आताचे गांधीनगर येथे कुटुंब छावण्या (बरॅक) बांधण्यात आल्या. येथे पाच हजार पोलंडचे नागरिक १९४३ ते ४८ या कालावधीत राहायला होते.

एवढेच नव्हे तर गरजेच्या वस्तूंसाठी बाजारपेठही त्यांना पुरविण्यात आली; त्यामुळे ही छावणी एक सुसज्ज वसाहत म्हणून नावारूपाला आली. त्यांनी येथे बागा फुलविल्या, रस्त्यांना पोलिश नावे दिली. शाळा, दवाखाना आणि एक चर्च, थिएटरही उभारले.येथे अनेकांचा जन्म झाला, कित्येकांचे बालपण गेले; त्यामुळे कोल्हापूरच्या वळिवडे छावणीबरोबर या पोलिश नागरिकांचे भावनिक नाते जडले आहे. म्हणूनच त्यांच्या आठवणी. संग्रहालयपाने जपण्यात येणार आहेत.

कँप वळिवडे येथील जीवन आणि काळ याची आताच्या आणि पुढील पिढ्यांना माहिती व्हावी, हा या मागचा उद्देश आहे. येथे त्या काळातील छायाचित्रे, चित्रे व महत्त्वाच्या वस्तू व साहित्य ठेवले जाणार आहे. येत्या वर्षभरात हे संग्रहालय उभे राहील.साहित्यासाठी आवाहनया वसाहतीत आपल्या वस्तू विकण्यासाठी कोल्हापुरातून अनेक व्यावसायिक येथे यायचे. पद्मा पथकमधील खेळाडू व पोलिश नागरिकांमध्ये फुटबॉलचा खेळ रंगायचा. परदेशी, सोळंकी, गायकवाड घराणे, काशीकर कुटुंब असे अनेक लोक पोलंडवासीयांच्या सहवासात होते. ज्या नागरिकांकडे त्यांच्याशी निगडीत छायाचित्रे, तत्कालीन वस्तू अथवा साहित्य असतील, तर ते संग्रहालयासाठी द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरInternationalआंतरराष्ट्रीय