शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

केडीएमजीच्या माध्यमातून कोल्हापूरातील तब्बल दीडहजार टन कचऱ्याचा उठाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 19:56 IST

कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुपच्या माध्यमातून कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात साफसफाई करण्यात आली. यामध्ये विविध संघटनांनी भाग घेतला होता. दिवसभरात तब्बल दीड हजार टन कचºयाचा उठाव करण्यात आल्याची माहिती केडीएमजीचे संयोजक इंद्रजित नागेशकर यांनी दिली.

ठळक मुद्देकेडीएमजीच्या माध्यमातून कोल्हापूरातील तब्बल दीडहजार टन कचऱ्याचा उठाव

कोल्हापूर : कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुपच्या माध्यमातून कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात साफसफाई करण्यात आली. यामध्ये विविध संघटनांनी भाग घेतला होता. दिवसभरात तब्बल दीड हजार टन कचºयाचा उठाव करण्यात आल्याची माहिती केडीएमजीचे संयोजक इंद्रजित नागेशकर यांनी दिली.देशातील आघाडीची हाउसकीपींगची सेवा देणाऱ्या बीव्हीजी या कंपनीने कोल्हापूर शहरातील पूरग्रस्तांसाठी आठदिवस सातत्याने सेवा दिली. कंपनीचे ८५ कर्मचारी, १५ डॉक्टर, २५ सहायक कर्मचारी अशा एकुण १२५ जणांच्या पथकाने साफसफाई करत तब्बल दीडहजार टन कचरा उचलला, अशी माहिती बीव्हीजी कंपनीचे विकास भोसले, अमोल कदम, उदय देशमुख, विजय गायकवाड यांनी दिली.कोल्हापूर शहरातील काम आटोपून कंपनीच्या पथकाने ग्रामीण भाग आणि सांगली कडे रवाना झाली आहे. केडीएमजीचे संयोजक इंद्रजित नागेशकर, रवीबापू पाटील सडोलीकर, रवी माने, उदय निचिते यांनी त्यांचे आभार मानले.केडीएमजीच्या माध्यमातूनही आज साफसफाई व कचरा उठाव मोहीम चालवण्यात आली त्याची माहिती केडीएमजीचे संयोजक उदय निचिते यांनी दिली. केडीएमजीच्या सहा पथकांमार्फत शहरातील पाटील वाडा, कुंभार गल्ली, महावीर गार्डन, न्यू पॅलेस, रमण मळा येथे स्वच्छता करण्यात आली. संजय फाऊंडेशनमार्फत निजंर्तुक फवारणी करण्यात आली.

या मोहिमेचे नेतृत्व चेतन चव्हाण, प्रशांत काटे, प्रमोद माजगावकर, विश्वजीत जाधव, आदित्य बेडेकर आदीनी केले. या मोहिमेत नवी मुंबईच्या ६५, किर्लोस्करचे १५, आरएनएसचे १५, कोल्हापूर पोलीस खात्याचे ५0 तसेच महानगरपालिकेच्या सफाई विभागाच्या ५0 कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. कोल्हापूर जिल्हा नाभिक संघाच्या ५0 सदस्यांनीही नागाळा पार्कात सेवा दिली आहे.तत्पर वैद्यकीय सेवाकेडीएमजीमार्फत दिवसभरात १६00 रुग्ण तपासण्यात आले आणि ४८,000 रुपयांची औषधे विनामूल्य वितरित करण्यात आली. वाईल्डर मेमोरिअल चर्च, बापट कॅम्प, गवत मंडई, उत्तरेश्वर, पंचमुखी गणेश मंदिर, शाहुपुरी, आंबवडे, काखे, वारणानगर, सोनतळी, रजपूतवाडी, जिल्हाधिकारी कार्यालयाची मागची बाजू, कणेरी मठ, पेठवडगाव, बाजार भोगाव येथे औषधे देण्यात आली.पूरग्रस्त भागात साफसफाईचे काम करण्यासाठी नवी मुंबईची एक टीम गेली आठ दिवस सेवा देत होती, पण त्यातील काही सदस्य शुक्रवारी रात्री आजारी पडल्याची माहिती केडीएमजीच्या पवन गवस आणि प्रविण सोलंकी यांना मिळाल्यावर त्यांनी मध्यरात्री डॉक्टर असोसिएशनच्या शीतल पाटील यांच्या सहकार्याने त्यांच्या उपचाराची व्यवस्था केली. गेली आठ दिवस पूरग्रस्तांसाठी सेवा देणारे डॉ. शीतल हे स्वत:च आजारी पडले होते.

केडीएमजीमार्फत कोवाड येथे पूरग्रस्तांसोबतच पशू तपासणी शिबीराचे दोन ठिकाणी आयोजन केले होते. यासाठी जितो संघटनेमार्फत या शिबिरासाठी लागणारे कॅटलफीड पुरवण्यात आले. केडीएमजीच्या वैद्यकीय सेवेमध्ये कोल्हापूर मेडिकल असोसिएशन, जनरल पॅ्रक्टिशनर असोसिएशन, नॅशनल होमिओपॅथिक असोसिएशन आणि प्रायव्हेट हॉस्पिटल्स अ‍ॅन्ड नर्सिंग होम्स असोसिएशन या संघटना सहभागी झाल्याची माहिती डॉ. शीतल पाटील, डॉ. दीपक पोवार, डॉ. शिवराज देसाई, डॉ. हरीश नांगरे, डॉ. हर्षवर्धन, डॉ संजीव कददू यांनी दिली आहे. दरम्यान, मुंबईच्या एअरपोर्ट इनलाईन सिक्युरिटी सर्व्हिसेसच्या भरत राणे यांनी दोन लाख रुपयांची औषधे केडीएमजीच्या वैद्यकीय पथकाकडे सुपूर्द केली आहेत.तीनशेहून अधिक घरात गृहोपयोगी वस्तूंची मदतकेडीएमजीकडे विविध दानशूर व्यक्ती व संस्था यांनी गृहोपयोगी वस्तू शिदोरीच्या स्वरुपात दिल्या होत्या, ती मदत उत्तरेश्वर भागातील १00 हून अधिक घरात प्रत्यक्ष पोहोचविण्यात आल्याची माहिती संयोजक उत्तम फराकटे यांनी दिली. अशा प्रकारे तब्बल तीनशेहून अधिक घरात पूर्ण सर्वेक्षण करून मदत पोहोचवण्यात आली आहे.स्ट्रक्चरल आॅडिटचे काम सुरुकेडीएमजीच्या माध्यमातून असोसिएशन आॅफ स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगही काम करीत असून त्यांच्या मदतीला २५ विद्यार्थी अभियंतेही धावले आहेत. या पथकाने घराघरांची तपासणी सुरु केली असून आज आणि उदयाही हे पथक पूरग्रस्त भागात जावून पाहणी करणार आहे.

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरkolhapurकोल्हापूर