शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

kdcc bank result : आजऱ्यातून सुधीर देसाई विजयी, मात्र चर्चा फुटलेल्या मतांचीच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2022 11:24 IST

नेत्यांवर केलेली जहरी टीका कार्यकर्त्यांच्या मनाला लागल्याने त्याचा परिणाम निवडणूक निकालात दिसून आला आहे.

सदाशिव मोरेआजरा :  जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आजऱ्यातून सुधीर राजारामबापू देसाई ५७ मते घेऊन निवडून आले आहेत. तर विद्यमान संचालक अशोक चराटी यांना ४८ मते मिळाली. मतदान वेळी रांगेतील मते व मिळालेली मते यामध्ये तफावत असल्याने फुटलेली मते व बाद मताचा शिलेदार कोण ? याची चर्चा आजरा तालुक्यात रंगली आहे. देसाई विजयी झाल्याचे वृत्त समजताच आजऱ्यात फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करण्यात आली.जिल्हा बँकेवर पंचवीस वर्षे राजारामबापू देसाई यांनी निर्विवाद वर्चस्व मिळवून सत्ता मिळविली होती. त्यावेळी ते बॅंकेचे उपाध्यक्षही झाले होते. दहा वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत राजारामबापू देसाई यांचा पराभव करीत काशिनाथअण्णा चराटी यांनी विजय मिळवला होता.चालू वेळच्या निवडणुकीत या दोन नेत्यांच्या वारसदारांमध्ये लढत होती. त्यामध्ये सुधीर देसाई यांनी बाजी मारून आजऱ्यातून जिल्हा बँकेवर सत्ता मिळविली आहे. नेत्यांवर केलेली जहरी टीका कार्यकर्त्यांच्या मनाला लागल्याने त्याचा परिणाम निवडणूक निकालात दिसून आला आहे...फुटलेल्या व बाद मतांचा शिलेदार कोण?मतदानादिवशी सुधीर देसाई यांच्या रांगेत ५५ तर अशोक चराटी यांच्या रांगेत ५१ मते होती. निकालात मात्र देसाई यांना ५७  व चराटी यांना ४८ मते व एक मत बाद झाले आहे. आर्थिक घडामोडी बरोबर नोकऱ्या व रांगेत उभा राहूनही ती फुटलेली तीन मते कोणाची व बाद मताचा शिलेदार कोण ?? याची चर्चा आजरा तालुक्यात  रंगली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकbankबँकResult Dayपरिणाम दिवस