शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

kdcc bank election : शाहूवाडीत एकमेकांचे कट्टर विरोधक आले एकत्र, कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2022 19:01 IST

एकमेंकाचे कट्टर विरोधक असणारे मानसिंगराव गायकवाड व जिल्हा बँकेचे संचालक सर्जेराव पाटील - पेरीडकर हे एकत्र आल्याने सर्वच कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या.

सरुड : जिल्हा बँकेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. सर्वच गटात चुरशीने मतदान झाले. याच दरम्यान शाहूवाडी येथील मतदान केंद्रावर एकमेंकाचे कट्टर विरोधक असणारे मानसिंगराव गायकवाड व जिल्हा बँकेचे संचालक सर्जेराव पाटील - पेरीडकर हे एकत्र आल्याने मतदान  केंद्रावर उपस्थित असणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांच्या  भुवया उंचावल्या. शाहूवाडी तालुक्यात संस्था गटात विद्यमान संचालक सर्जेराव पाटील व मानसिंग राव गायकवाड यांचे चिरंजीव रणवीर सिंह गायकवाड यांच्यात काटा लढत होत आहे. सकाळ पासुनच मतदान केंद्रावर चुरस दिसून येत होती. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मानसिंगराव गायकवाड व सर्जेराव पाटील - पेरीडकर हे शाहूवाडी येथील मतदान केंद्रावर ठाण मांडून बसले होते. यावेळी मतदान केंद्रावर कर्णसिंह गायकवाड, शिवसेनेचे जि. प. सदस्य हंबीरराव पाटील, माजी उपसभापती विष्णू पाटील - सोनवडेकर, महादेवराव पाटील - साळशीकर, प. स. सदस्य अमरसिंह खोत हे ही उपस्थित होते. तेथे उपस्थित असलेल्या पत्रकारांनी त्यांना फोटोसाठी एकत्र उभा राहण्याची विनंती केली.

पत्रकारांच्या या विनंतीस मान देत व थोड्या वेळासाठी राजकारण बाजुला ठेवत शाहूवाडीच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले मानसिंगराव गायकवाड व सर्जेराव पाटील - पेरीडकर यांच्यासह मतदान केंद्रावर उपस्थित आपल्या कार्यकर्त्यांसह एकत्र येत फोटो साठी पत्रकाराना पोझ दिली. फोटोसाठी का होईना किमान शाहूवाडीतील एकमेकांचे कट्टर विरोधक व त्यांचे कार्यकर्ते एकत्र आल्याची चर्चा मतदान केंद्रावर सुरु होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँकElectionनिवडणूकshahuwadi-acशाहूवाडी