शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

kdcc bank election : पालकमंत्री सतेज पाटील यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत दाखल केला उमेदवारी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2021 13:22 IST

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. आज, राज्याचे गृह राज्यमंत्री तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.बँकेचे अध्यक्ष, राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही सकाळी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कागल विकास संस्था गटातून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, पालकमंत्री सतेज पाटील यांनी गगनबावडा तालुका विकास संस्था गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी गगनबाबडा तालुक्यातील एकूण ६६ ठरावधारकांपैकी ४९ ठरावधारक फेटे बांधून मंत्री सतेज पाटील यांच्यासोबत उपस्थित होते. यामुळे बँक परिसरात मोठी गर्दी झाली होती.तर दूध व इतर संस्था गटातून भैय्या माने अर्ज भरणार आहेत. त्याशिवाय महिला गटातून निवेदिता माने तसेच प्रक्रिया व खरेदी-विक्री संस्था गटातून बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर अर्ज दाखल करणार आहेत. याशिवाय इतर गटांतूनही काही अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. उद्यापासून अर्ज दाखल करण्यास गर्दी होऊ शकते. अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत ३ डिसेंबरपर्यंत असून, ५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी ही निवडणूक होत आहे.  बारा तालुक्यातील विकास संस्था गटातून बारा तर इतर गटातून नऊ जागा निवडून द्यावयाच्या आहेत. तर ७ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँकElectionनिवडणूकSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील