शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या कथक नृत्यांगना विदुषी मंगला भट्ट यांचे निधन

By विश्वास पाटील | Updated: June 16, 2025 18:10 IST

संगीत नाटक अकादमी पुरस्काराने झाला होता सन्मान

कोल्हापूर: संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित विदुषी मंगला भट्ट यांचे वयाच्या ६३ व्या वर्षी अल्पशा आजाराने हैदराबाद येथे आज, सोमवारी (दि.१६) निधन झाले. मूळच्या त्या कोल्हापूरच्या होत्या.पूर्वाश्रमीच्या मंगला कुलकर्णी यांनी दिल्ली कथक केंद्रामध्ये पंडित दुर्गालालजी यांच्याकडून कथकचे धडे घेतले. मंगलाताईंनी देश-विदेशामध्ये अनेक महोत्सवांमध्ये आपल्या कथक नृत्यप्रतिभेच्या अविष्कार सादर केला. प्रतिभावंत नृत्यांगना म्हणून त्यांचा नावलौकिक होता. हैदराबाद येथील त्यांच्या आकृती कथक केंद्रासोबतच वेळोवेळी परदेशात राहून कथकच्या प्रशिक्षणाचे तसेच प्रचार- प्रसाराचे कार्य केले. केंद्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कारासोबतच तेलंगणा, आंध्रप्रदेश इत्यादी राज्यातील महत्त्वाच्या पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला होता. मंगलाताई कोल्हापूरशी असलेले ऋणानुबंध जपण्यासाठी गेली काही वर्षे गार्गीदेवी निंबाळकर यांच्या माध्यमातून कथकचे प्रशिक्षण देत होत्या. पंडित बिरजू महाराज यांचे ज्येष्ठ शिष्य पंडित राघवराज भट्ट हे त्यांचे पती आहेत. त्यांच्या पश्चात पती, मुलगा आणि सून आहे.