शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

काश्मीर ते कोल्हापूर सायकल सफर; कोल्हापूरच्या सात जणांनी २४०० किलोमीटर लीलया केले पार

By संदीप आडनाईक | Published: December 29, 2023 4:46 PM

कोल्हापूर : सायकल चालविल्यामुळे प्रदूषण होत नाही, शरीराचा चांगला व्यायाम होतो, शरीर आणि मन निरोगी, उत्साही, आनंदी राहते, असा ...

कोल्हापूर : सायकल चालविल्यामुळे प्रदूषण होत नाही, शरीराचा चांगला व्यायाम होतो, शरीर आणि मन निरोगी, उत्साही, आनंदी राहते, असा संदेश देत बर्फ, उभ्या चढ-उताराचा रस्ता पार करत ७१ वर्षांचे तरुण तुर्क आणि ४७ वर्षाचे वृद्धत्वाकडे झुकलेल्या कोल्हापूरच्या सात जणांनी नुकतीच काश्मीर ते कोल्हापूर सायकल सफर लीलया पूर्ण केली.धैर्यशील पाटील (वय ५३, रा. कसबा बावडा), महिपती संकपाळ (वय ६५, रा. जरगनगर), आकाश रांगोळे (वय ४७, रा. जरगनगर), रामनाथ चोडणकर ( वय ५७ रा. जवाहरनगर), वसंत घाडगे (वय ६७, राजारामपुरी), निशिकांत साळवेकर (वय ५९, मंगळवार पेठ), अविनाश बोकील (वय ७१, रा. आरके नगर), महादेव पाटील (वय ५०, रा. कळंबा) हे सात सायकलवीर काश्मीरमधून १८ दिवसात २४०० किलोमीटर इतके अंतर सहजपणे पार करत कोल्हापुरात परतले. यापैकी धैर्यशील पाटील, रामनाथ चोडणकर, आकाश रांगोळे, महादेव पाटील पुढे कन्याकुमारीपर्यंत सायकलीवरून जाऊन तिथे तिरंगा फडकवला. २१ नोव्हेंबरला हे सर्व जण विमानाने श्रीनगरमध्ये पाेहोचले. आधीच पाठविलेल्या सायकली जोडल्यानंतर २३ तारखेला त्यांनी श्रीनगरमध्ये लाल चौकात तिरंगा फडकावून सायकल प्रवास सुरू केला. जम्मू काश्मिर, राजस्थान, गुजरातमार्गे ते महाराष्ट्रात परतले.प्रतिकूल हवामानामध्येही ते रोज दीडशे किलोमीटर सायकल चालवायचे. सायकलचा वापर सर्वांनी केल्यास वाहतूक कोंडी, पार्किंग यासारख्या समस्या सुटतील. सार्वजनिक, शारीरिक आणि मानसिक आरोग्य, पर्यावरण, रस्ता रुंदीकरण यावर केवळ सायकलिंग हाच पर्याय आहे, अशाही प्रतिक्रिया या सात जणांनी दिल्या.

२०१४ पासून सायकलिंगकोल्हापुरातील या ग्रुपने २०१४ पासूनच चंदीगड ते लेह असा सायकल प्रवास करून सायकलिंगला सुरुवात केली. दरवर्षी एका ठिकाणी त्यांचा प्रवास होतो. यामध्ये लेहला तीन वेळा सायकल प्रवास त्यांनी केला आहे. पत्नीसोबतही २०१७ मध्ये सिमला ते स्पीतीव्हॅली असा सायकल प्रवास या ग्रुपने केला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJammu Kashmirजम्मू-काश्मीरCyclingसायकलिंग