शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

कसबा बोरगावमध्ये भिंत कोसळून शेतकरी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 01:10 IST

पन्हाळा तालुक्यातील कसबा बोरगाव येथे शेततळ्याची संरक्षण भिंत अंगावर कोसळून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला.

करंजफेण : पन्हाळा तालुक्यातील कसबा बोरगाव येथे शेततळ्याची संरक्षण भिंत अंगावर कोसळून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. श्रीपती ज्ञानू चौगले (वय ५२) असे त्यांचे नाव आहे. गुरुवारी दुपारी ही घटना घडली.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, कसबा बोरगाव येथे रस्त्यालगतच अजित नरके यांचे फार्म हाऊस आहे. त्यांनी या ठिकाणी एक एकर क्षेत्रात शेततळे बांधले असून, त्याला शंभर फूट लांबीची व वीस फूट उंचीची संरक्षक भिंत बांधली आहे. गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास श्रीपती चौगले हे पत्नी उषासोबत वैरणीला गेले होते. उषा वैरण घेऊन शेततळ्याच्या भिंतीलगत असलेल्या रस्त्यावरूनच पुढे घरी गेल्या.

काही वेळाने त्यांच्यापाठोपाठ आलेल्या श्रीपती चौगले यांच्या अंगावर ही भिंत अचानक कोसळली आणि ढिगाºयाखाली ते गाडले. भिंत कोसळल्याचे समजताच गावकरी जमा झाले. गावकºयांनी चार तासांनंतर ब्रेकरच्या साह्याने भिंत फोडून श्रीपती यांचा मृतदेह बाहेर काढला.

भिंतीच्या बांधकामात हलगर्जीपणा केला असल्याचा आरोप करीत यातील काहीजणांची संदीप नरके यांच्यासोबत वादावादी झाली. त्यांच्या अंगावर ते धावून गेले. यावेळी अ‍ॅड. प्रकाश देसाई व पन्हाळ्याचे फौजदार रवींद्र साळोखे, शशिकांत गिरी यांनी अजित नरके यांच्यासोबत ग्रामस्थांसमोर चर्चा केली. ग्रामस्थांची समजूत काढून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. यावेळी संदीप नरके यांनी चौगले कुटुंबाला सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगताच जमाव शांत झाला.मोठा अनर्थ टळलाया भिंतीजवळून भात रोप लावण्यासाठी दिवसा अनेक महिला व शेतकरी एकत्ररीत्या जातात; परंतु यावेळी जास्त कोणी नसल्यामुळेच मोठा अनर्थ टळला. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. भिंतीच्या वरील बाजूस अनेक दिवसांपासून भांगा धरला असताना याकडे दुर्लक्ष का करण्यात आले, असा ग्रामस्थांमधून प्रश्न उपस्थित होत होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeathमृत्यू