शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याच्या मंत्र्यांच्या अभिनयाला करवीरकरांची दाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 15:37 IST

गोवा सरकारमधील कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांच्या अभिनयाला करवीर रसिकांनी मोठी दाद दिली. प्रतिज्ञा नाट्यरंगच्या तीन दिवसांच्या कलामहोत्सवाच्या अखेरच्या दिवशी गुरुवारी त्यांनी ‘इथे ओशाळला मृत्यू’मधील छत्रपती संभाजी महाराजांची तडफदार भूमिका साकारली.

ठळक मुद्दे‘इथे ओशाळला मृत्यू’मध्ये साकारली संभाजी राजेंची भूमिकाप्रतिज्ञा कला महोत्सवाची सांगता

कोल्हापूर : गोवा सरकारमधील कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांच्या अभिनयाला करवीर रसिकांनी मोठी दाद दिली. प्रतिज्ञा नाट्यरंगच्या तीन दिवसांच्या कलामहोत्सवाच्या अखेरच्या दिवशी गुरुवारी त्यांनी ‘इथे ओशाळला मृत्यू’मधील छत्रपती संभाजी महाराजांची तडफदार भूमिका साकारली.केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये गेले तीन दिवस हा महोत्सव सुरू होता. अखेरच्या दिवशी घोणशी, बांदोडा फोंडा येथील श्री विठोबामारूती देवस्थानच्या वतीने या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. या नाटकामध्ये गावडे हेच प्रमुख भूमिकेत असून, ते गोवा सरकारचे कला व सांस्कृतिक मंत्री आहेत. त्यांच्या रंगमंचावरील एन्ट्रीलाच रसिकांनी टाळ्या वाजविल्या.रवींद्र नाईक यांनी दिग्दर्शन केले असून, गिरीश वेळगेकर, महेश शीलकर, रतिष गावडे, सर्वानंद कुर्पासकर, मिलिंद बांदोडकर, नम्रता नाईक, प्रशांत वझे, दिलेश कोलवेकर, ईश्वर नाईक, संदीप फडते, गजानन नाईक, केदार गावडे, अमोल नाईक यांनीही या नाटकामध्ये भूमिका साकारल्या.मध्यंतरावेळी मंत्री गोविंद गावडे, कार्यक्रम अधिकारी गोविंद शिरोडकर, गोव्याचे नाट्यकर्मी भालचंद्र उसगावकर यांच्यासह कोल्हापूरचे प्रतिज्ञाचे प्रशांत जोशी, रमेश सुतार, प्रेषित शेंडगे, मिलिंद अष्टेकर, सुनील घोरपडे यांचाही यावेळी गोवा सरकारच्या कला व सांस्कृतिक विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला.प्रशांत जोशी यांच्या प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेच्या वतीने तीन दिवसांच्या या कलामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला गोवा शासनाच्या कला व सांस्कृतिक विभागाने सहकार्य केले होते. या तीनही दिवसांच्या कार्यक्रमांना रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या तीनही कार्यक्रमांदरम्यान गरजूंना मदत करण्यात आली. 

 

टॅग्स :Natakनाटकgoaगोवाkolhapurकोल्हापूरSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती