कोल्हापूर : कमालीची राजकीय ईर्षा, जबरदस्त चुरस यामुळे केवळ जिल्ह्यातच नाही, तर संपूर्ण राज्यात करवीर मतदारसंघाने सर्वाधिक मतदानाचा बहुमान पटकावला. काल, बुधवारी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ‘करवीर’ने ८४.१९ अशी विक्रमी मतदानाची टक्केवारी नोंदविली. पाठोपाठ कागल मतदारसंघाने ८२.४७ टक्के मतदानाची नोंद करून दुसऱ्या स्थानावर राहण्याचा मान मिळविला. याउलट ‘शहरी मतदारसंघ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर उत्तरमध्ये जिल्ह्यात सर्वांत कमी म्हणजे ६१.५२ टक्के मतदान झाले. करवीर व कागल या दोन मतदारसंघांत पहिल्यापासून जबरदस्त राजकीय ईर्षा होती. आरोप-प्रत्यारोप आणि कॉँग्रेस व राष्ट्रवादीसमोर शिवसेनेने निर्माण केलेले जबरदस्त आव्हान यामुळे मतदारसंघांत प्रचारादरम्यान मोठी ईर्षा निर्माण झाली होती. त्याचा परिणाम टक्केवारी वाढण्यात झाली. टक्केवारीचे उद्दिष्ट अपूर्णचजिल्ह्यातील दहा मतदारसंघांत ८० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान व्हावे याकरिता जिल्हा प्रशासनाने जाणीवपूर्वक प्रयत्न करूनही हे उद्दिष्ट कोल्हापूर शहरातील मतदारांच्या प्रतिसादाअभावी गाठता आले नाही. पैसे दिले नाहीत म्हणून ....कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील यादवनगर झोपडपट्टीतील काही मतदारांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला नाही. या झोपडपट्टीत म्हणे कोणाही उमेदवाराची पाकिटे पोहोचली नाहीत. जर कोणी उमेदवार आपली दखल घेत नसेल, तर कशाला मतदान करायचे? अशा मानसिकतेत असलेल्या मतदारांनी मतदानच केले नाही. या परिसरातील मतदान केंद्रावर केवळ ४० टक्के मतदान झाले. मतदानात पुरुषांची आघाडी कोल्हापूर जिल्ह्यातील दहा मतदारसंघांत २९ लाख १८ हजार १४ मतदारांपैकी २१ लाख ९२ हजार ७०९ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये ११ लाख ४४ हजार ४२ पुरुष मतदारांचा, तर १० लाख ४८ हजार ६६० महिला मतदारांचा समावेश आहे. मतदारयादीत नोंद असलेल्या ५५ पैकी केवळ ७ तृतीयपंथी मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची ही टक्केवारी ७५.१५ इतकी आहे.विधानसभा निवडणूक मतदान आकडेवारी मतदारसंघाचे नावपुरुष मतदारमहिला मतदारझालेले मतदानटक्केवारीचंदगड१०५७५३ १०९९४५ २१५६९८७२.0७ %राधानगरी१२०९६३११४३००२३५२६३७६.७६ %कागल१२७३०५१२१७५४ २४९०५९ ८२.४७ %कोल्हापूर दक्षिण११४१६४१०३००५२१७१६९७०.०८ %क रवीर१२९३८८११३७२७२४३११५८४.१९ %कोल्हापूर उत्तर९२७८५८२३५२१७५१३७६१.५२ %शाहूवाडी १०८६५८९९८७९२०८५३७७८.०० %हातकणंगले १२०६४८१०२९६०२२३६०८७३.९१ %इचलकरंजी१०६३१३९३५७२१९९८९२७४.३१ %शिरोळ११८०६५१०७१६६२२५२३१७८.२२ %एकूण मतदान११४४० ४२१०४८६६०२१९२७०९७५.१५ %गतवेळच्या निवडणुकीसाठी ७३.९७ टक्के मतदान झाले होते. त्यापेक्षा यावेळी जादा मतदान झाले.
राज्यात अव्वल करवीरचे ‘वीर’
By admin | Updated: October 17, 2014 00:52 IST