शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

‘करवीर’ला विकासाचे मॉडेल करणारच--माझा अजेंडा...!

By admin | Updated: November 14, 2014 23:33 IST

शेतीस अखंडित वीजपुरवठा : ‘धामणी’ प्रकल्प पूर्ण करणार, गगनबावड्यात ‘एमआयडीसी’ उभारणार

राजाराम लोंढे  कोल्हापूर -रस्ते, पाणी, वीज या मूलभूत गरजांबरोबर औद्योगिक क्रांतीच्या माध्यमातून करवीर मतदारसंघ राज्यात ‘मॉडेल’ बनवू, असा विश्वास आमदार चंद्रदीप नरके यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. आगामी पाच वर्षांत कोल्हापूर-गगनबावडा चौपदरीकरण, धामणी प्रकल्प पूर्ण करणे, शेतीपंपाला अखंडित वीजपुरवठा यांसह गगनबावड्यात ‘मिनी एमआयडीसी’ उभी करणे ही कामे प्राधान्याने मार्गी लावणार असल्याचेही त्यांनी सांगितले.मागील पाच वर्षांत करवीरच्या जनतेला दिलेले अभिवचन पूर्ण करू शकलो, याबद्दल समाधान वाटत असले तरी आता जबाबदारी वाढली आहे. मतदारसंघात अजूनही काही गावांत मूलभूत प्रश्न आहेत, ते मार्गी लावणार आहे. बहुतांश गावांना जोडणारे रस्ते गेल्या पाच वर्षांत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. कोल्हापूर-गगनबावडा हा मार्ग तळकोकणाशी जोडला जात असल्याने त्याचे चौपदरीकरण करणे व त्याचबरोबर कोल्हापूर-भोगावती रस्त्याचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे. कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यासाठी मान्यता मिळाली असून, येत्या वर्षभरात ते पूर्णत्वास जाईल. काही वाड्या-वस्त्यांवर पाणीप्रश्न व रस्त्यांचे प्रश्न आहेत, ते मार्गी लावणार आहेच; पण रस्ते व पाणी योजना याशिवाय मतदारसंघाचा औद्योगिक विकास केला तरच तेथील जनजीवन उंचावण्यास मदत होणार आहे. त्यामुळे आगामी पाच वर्षांत त्यासाठी मी विशेष प्रयत्न करणार आहे. मतदारसंघातील निगवे क्रीडासंकुल पूर्ण झालेले आहे. गगनबावडा, बाचणी या क्रीडासंकुलांसाठी अनुक्रमे ७५ व ९० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. परिसरातील क्रीडापटूंसाठीही अद्ययावत क्रीडासंकुल होणे गरजेचे आहे. हसूर, कुरुकली, कोगे या परिसरात पावसाळ्यात नद्यांना पूर आल्यानंतर वाहतुकीची कोंडी होते. या परिसरातील नागरिकांना होडी (नावे)चा आधार घ्यावा लागतो. या पुलासाठी ‘नाबार्ड’कडून निधी घेऊन हा प्रश्नही मार्गी लावणार आहे. शेतीपंपांच्या विजेचा प्रश्न मोठा आहे. शेतकऱ्यांना आठ तास वीज दिली जाते. तीही खंडित असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. त्यांना मुबलक वीज, तीही दिवसाची मिळाली पाहिजे, यासाठी आगामी काळात प्रयत्न करणार आहे. मतदारसंघात गुऱ्हाळघरांची संख्या मोठी आहे. त्यांचे प्रश्न वेगळे आहेत. गुळाच्या अस्थिर दरामुळे गुऱ्हाळघरे अडचणीत आली आहेत. साखर उद्योगासमोरही संकटांचा डोंगर आहे. गूळ व साखरेला हमीभाव मिळाला पाहिजे, यासाठी राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. मतदारसंघातील हजारो शेतकऱ्यांच्या जीवनात संजीवनी ठरणारा धामणी प्रकल्प पूर्णत्वासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. प्रकल्प पूर्ण होण्यात काही तांत्रिक अडचणी आहेत. त्या दूर करून प्रकल्प मार्गी लावला जाईल. मतदारसंघातील भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे. गगनबावडा तालुक्यात बेरोजगारीचा प्रश्न आहे. त्याचबरोबर तेथील जीवनमान उंचावण्यासाठी येथे छोटे-छोटे उद्योग आले पाहिजेत. यासाठी येथे मिनी एमआयडीसी आणण्याचा माझा प्रयत्न राहील, असेही आमदार नरके यांनी सांगितले. होय ! यासाठी आग्रहीआधुनिक कृषी महाविद्यालय : अपारंपरिक शेती, पणन, उत्पादन, खते यांबद्दल नेमकी व आधुनिक माहिती देणारी महाविद्यालये. धामणी प्रकल्प : प्रलंबित धामणी प्रकल्प मार्गी लावणारबांबू लागवड : गगनबावडा तालुक्यात बांबू लागवडीस प्राधान्य देणार २४ तास वीजपुरवठा : शेतीपंपासाठी २४ तास वीजपुरवठाटोलचा प्रश्न : सामान्य माणसांना भुर्दंड असलेल्या टोलला हद्दपार करणारचपर्यटन केंद्रे : पन्हाळा व गगनबावडा हा परिसर निसर्ग, डोंगर व जंगलांनी नटलेला आहे. येथील पर्यटन व्यवसायाला गती देण्यासाठी पर्यटन केंद्रे विकसित करणारमहिलांना रोजगार : महिलांना बचतगटांच्या माध्यमातून छोटे उद्योग निर्मिती करून देणार. राज्यात नवीन सरकार सत्तेवर आल्यावर ‘लोकमत’ने रेंगाळलेले प्रश्न ही मालिका प्रसिद्ध केली. या मालिकेतून प्रत्येक तालुक्यांतील समस्या तसेच अनेक वर्षांपासून ‘जैसे थे’ असलेले प्रश्न पुढे आणले. आता या समस्या तसेच रेंगाळलेल्या प्रश्नांवर नवनिर्वाचित आमदारांचा ‘माझा अजेंडा...!’ ही मालिका सुरू करीत आहोत. नूतन आमदारांचा आगामी पाच वर्षांतील विकासाचा नेमका अजेंडा काय असणार, हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ करीत आहे. त्याची सुरुवात आज, शनिवारपासून करवीर विधानसभा मतदारसंघापासून करीत आहोत. आमदार चंद्रदीप नरके यांच्याशी केलेली बातचित....