शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यानृसिंह भारतींनी माफी मागावी, अन्यथा..; कोल्हापुरातील राजर्षी शाहूप्रेमींचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 11:43 IST

करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी जातीव्यवस्थेवर केले होते वादग्रस्त वक्तव्य 

कोल्हापूर : करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी मनुस्मृतीवर आधारित ब्राह्मणी जातीव्यवस्था टिकली पाहिजे, आरक्षण संपले पाहिजे, असे वक्तव्य केले. अशा प्रकारचे वक्तव्य करणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे. विद्यानृसिंह भारती यांनी माफी मागावी अन्यथा करवीर पीठावर मोर्चा काढू, असा इशारा राजर्षी शाहूप्रेमींच्या बैठकीत देण्यात आला.करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी पुण्यात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद कोल्हापुरात उमटत असून राजर्षी शाहूप्रेमींची चित्रदुर्ग मठात बुधवारी बैठक झाली. अध्यक्षस्थानी सरलाताई पाटील होत्या. गिरीश फोंडे म्हणाले, अशा प्रकारचे वक्तव्य करण्याचे धाडस ते करूच शकतात कसे? त्यांच्या मागे कोणती शक्ती कार्यरत आहे हे सांगायला नको. मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले, विद्यानृसिंहभारती यांना जाब विचारायचा आहे, त्यांना कोल्हापूरकरांचा हिसका दाखवत असताना शाहूंच्या भूमीत शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार जिवंत असल्याचे दाखवून देऊया. जनता दलाचे रवींद्र चव्हाण म्हणाले, विद्यानृसिंहभारती यांच्यामुळे जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था बिघडत असून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारची वक्तव्ये केली जात आहेत. अशा प्रवृत्तीचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांत तक्रार दाखल करूया. व्यंकाप्पा भोसले म्हणाले, यापूर्वी १९७४ ला तत्कालीन शंकराचार्यांनी असे वक्तव्य केले होते, त्यांना कोल्हापुरी हिसका दाखवला होता. ही विचारांची लढाई असून बिंदू चौकात धरणे धरत असतानाच त्यांच्यावर कारवाईसाठी आग्रह धरला पाहिजे. सतीशचंद्र कांबळे, दिलीप सावंत आदींनी मनोगत व्यक्त केले.यावेळी, शंकराचार्यांनी माफी मागावी अन्यथा करवीर पीठावर मोर्चा काढण्याचा इशारा देत उद्या पोलिस अधीक्षकांना भेटून गुन्हा दाखल करण्याची मागणी करूया, असा निर्णय घेण्यात आला. यावेळी अनिल चव्हाण, बाबूराव कदम, आर.के. पोवार, अशोक भंडारे, शिवाजीराव परुळेकर, संदीप देसाई, दगडू भास्कर, भारती पोवार, टी.एस. पाटील, सीमा पाटील, आदी उपस्थित होते.

शहरात कोपरा सभा घेऊया..शंकराचार्य काय बोलले? हे सामान्य माणसाला समजले पाहिजे. अन्यथा हिंदुत्ववाद्यांच्या हातात आयते कोलीत मिळेल. यासाठी कोल्हापूर शहरात २५-३० कोपरा सभा घेऊया, अशी सूचना अतुल दिघे यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर