शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
4
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
5
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
6
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
7
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिटकवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
8
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
9
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
10
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
11
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
12
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
13
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
14
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
15
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
16
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
17
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
18
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
19
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
20
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना

करवीर ‘डीबींची’ चौकशी रखडली

By admin | Updated: February 23, 2015 23:56 IST

न्यायालयीन आदेशानंतरही चालढकल : पोलीस प्रशासनाच्या ‘कारभारावर’ संशय

एकनाथ पाटील - कोल्हापूर - करवीर पोलीस ठाण्यामधील सात पोलीस कर्मचाऱ्यांनी पंचनामा न करता मोबाईल शॉपीमधील साहित्य हस्तगत करून परत न देणे, ते परत देण्यासाठी हजारो रुपयांची लाच मागणे, अशा गंभीर आरोपांची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने पोलीस प्रशासनास दिले होते. या आदेशाची प्रत प्राप्त होऊनही अद्यापही चौकशीचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले नसल्याने प्रशासनाच्या कारभारावर संशय व्यक्त केला जात आहे. तौसिफ खलील शेख याने कॉम्प्युटर व मोबाईल शॉपीमधून पोलिसांनी जप्त केलेल्या साहित्याची मागणी त्यांच्याकडे केली; परंतु हे साहित्य पोलिसांनी परत दिले नाही. त्यामुळे त्याने याप्रकरणी उच्च न्यायालयात पोलिसांच्या विरोधात रिट दाखल केली. त्यानुसार न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. डॉ. शर्मा यांनी आदेशाची प्रत मिळताच चौकशी केली जाईल, असे प्रसारमाध्यमांना सांगितले होते. आता ही प्रत मिळूनही चौकशीचे आदेश न दिल्याने ‘पोलीस अधीक्षकांकडून या करवीरच्या पोलिसांना अभय दिले जातेय काय?’ असा प्रश्न उपस्थित होत आहे. खून किंवा गुंतागुंतीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस ठाण्यांमध्ये स्वतंत्र गुन्हे शाखा (डीबी पथक) कार्यान्वित आहे. या पथकामध्ये वास्तविक प्रशिक्षण घेऊन अंगातील कौशल्य दाखवून नियुक्ती व्हावी, अशी नियमावली आहे; परंतु आजकाल कौशल्यापेक्षा ज्याचे राजकीय हितसंबंध चांगले त्याचीच वर्णी या जागी लागते. पदासाठी आवश्यक असणारे गुण, सांकेतिक भाषा, गुन्हे शोधून काढण्यासाठीची दूरदृष्टी, बोलण्यातील लकब, आरोपींच्या मनातील भाव जाणून त्याच्याकडून सत्य वदवून घेण्यासाठीची लागणारा ‘साम, दाम, दंड, भेद’ यापैकी एकही गुण आताच्या ‘डीबी’ पथकातील पोलिसांच्या अंगी नाही. वशिल्यांवर आलेले हे पोलीस गुन्हेगारीला प्रोत्साहन देत स्वत: आर्थिक बाजूने मोठे व्हायचा प्रयत्न करतात, अशा काही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांमुळे सर्वच पोलिसांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोनही तसाच बनतो. कारवाई संशयास्पद करवीरच्या पोलिसांनी शेखच्या मोबाईल शॉपीची पाहणी केली. त्यावेळी हवालदार बबलू शिंदे याने मोबाईल शॉपीमध्ये येण्यापूर्वी शर्टच्या आतमध्ये चार-पाच मोबाईल लपविल्याचे दिसले. त्यानंतर तेच मोबाईल काढून दुकानात चोरीचे मोबाईल सापडल्याचे त्याने दाखविले. पोलिसांनी दुकानाची केलेली तपासणी व जप्त केलेल्या साहित्याचे संपूर्ण सीसीटीव्हीमध्ये चित्रीकरण झाले आहे. हे चित्रीकरण पाहिले असता कारवाई संशयास्पद असल्याचे स्पष्ट दिसून येते. बंकट थोडगे मारहाण प्रकरणात याच पोलिसांचा समावेश होता. दोन महिन्यांपूर्वी एका म्हैस चोरी प्रकरणात याच पथकातील एकाने कारवाईची भीती दाखवून २५ हजार रुपये काढून घेतल्याची पोलीस वर्तुळात चर्चा आहे. न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळाली आहे. ती पाहून लवकरच चौकशी अधिकारी नियुक्त करून प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. - डॉ. मनोजकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक