शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

भर पावसात पोल उभा करुन सुरु केला कानूरचा वीजपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 16:58 IST

कोल्हापूर - भर पावसात विजेचा पोल उभा करुन, तुटलेल्या तारांना महापुरात जाऊन जोड देत महावितरणच्या वीज कर्मचाऱ्यांनी चंदगड तालुक्यातील ...

ठळक मुद्देभर पावसात पोल उभा करुन सुरु केला कानूरचा वीजपुरवठामहावितरणच्या वीज कर्मचाऱ्यांची महापुरात कामगिरी

कोल्हापूर- भर पावसात विजेचा पोल उभा करुन, तुटलेल्या तारांना महापुरात जाऊन जोड देत महावितरणच्या वीज कर्मचाऱ्यांनी चंदगड तालुक्यातील कानूरसह कुरणी, पुंद्रा, बुजवडे आदी गावांचा वीजपुरवठा शुक्रवारी (दि.7) सायंकाळी पूर्ववत केला असून, महावितरणच्या या कर्मचाऱ्यांचे पंचक्रोशीत कौतुक केले जात आहे.मंगळवारी (दि. 4) रात्री अकरा वाजेच्या सुमारास चंदगड तालुक्यातील कानूर उपकेंद्राला महापारेषणच्या हलकर्णी उपकेंद्रातून येणारा 33 केव्ही वीजपुरवठा ठप्प झाला. परिणामी कानूर 33/11 केव्ही उपकेंद्रावर अवलंबून असणाऱ्या गावातील वीज वितरण ठप्प झाले होते.

ही वाहिनी साधारणत: 12 किमी लांबीची असून, या मार्गात भाताची व उसाची शेती केली जाते. त्यामुळे या वाहिनीची पेट्रोलिंग करण्यासाठी प्रत्येक पोल व त्यावरील चिनीमातीचे इन्सूलेटर (चिमणी) तपासण्यात वेळ गेला. एका ठिकाणी वीज वाहिनी खांबावरुन खाली पडली होती. ती दुरुस्त करुन गुरुवारी रात्री 8.30 च्या सुमारास कानुर वीज उपकेंद्राला येणारा वीज पुरवठा पूर्ववत झाला.कानूर उपकेंद्र चालू झाले. मात्र उपकेंद्रातून बाहेर पडणाऱ्या 11 केव्ही कुरणी वाहिनीचा वीजपुरवठा सुरु झाला नव्हता. वीज कर्मचाऱ्यांनी पुन्हा शोध मोहीम हाती घेतली. दोन ठिकाणी चिनीमातीचे इन्सूलेटर फुटलेले सापडले. ते बदलले. तर पुढे पुंद्रा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत या वाहिनीवरील एक लोखंडी पोल कोसळला होता व त्याच्या तारा घटप्रभा नदीच्या महापुराच्या फुगवट्यात पडल्या होत्या.

भर पावसात पोल उभा करणे सोपे काम नव्हते. परंतु, ग्रामस्थांच्या मदतीने भर पावसात पोल उभा केला. कर्मचाऱ्यांनी पुरातील तार शोधून जोडली आणि कुरणी वाहिनी शुक्रवारी (दि.7) सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास पूर्ववत झाली. या वाहिनीवरील सर्व गावांचाही वीजपुरवठा सुरु करण्यात यश मिळाले.चंदगडचे उपकार्यकारी अभियंता विशाल लोधी, चंदगड-1चे शाखा अभियंता रविंद्र रेडेकर यांचेसह जनमित्र नामदेव घोडे, विलास मुर्ती, बाळू खराडे व बाह्यस्त्रोत कंत्राटी कर्मचारी योगेश गावडे, भेरट तेजम व तुकाराम इंगळे यांनी काम केले.एनडीआरएफच्या मदतीने गांधीनगरचा वीजपुरवठा पूर्ववततावडे हॉटेलजवळील एका खांबावर बिघाड झाल्याने गांधीनगर वीज उपकेंद्राला होणारा वीजपुरवठा शनिवारी रात्री 8 च्या सुमारास बंद पडला होता. बिघाड झालेल्या खांबाच्या सभोवती महापुराचे पाणी असल्याने पोलपर्यंत जाण्यासाठी बोटची गरज होती.एनडीआरएफच्या तुकडीने बोटीने वीज कर्मचाऱ्यांना पोलपर्यंत नेले. तिथे पोलवर चढून तांत्रिक बिघाड काढून उचगाव फिडरवरुन गांधीनगरचा वीजपुरवठा सुरु करण्याचे काम गांधीनगरचे शाखा अभियंता अतुल सुतार, उचगांवचे शाखा अभियंता रघुनाथ लाड, वीज कर्मचारी प्रकाश फराकरे, किरण कोळी, महेश बेंद्रे, नितीन कांबळे, संजय माणगावे व सुनील खटावकर यांनी केले आहे. 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरmahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर