शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कन्हैय्याकुमारने घेतली कोल्हापुरात पानसरेंच्या कुटूंबियांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 13:31 IST

जवाहरलाल नेहरू विश्वविद्यापीठातील विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष कन्हैयाकुमार याने बुधवारी सकाळी गोविंद पानसरे यांच्या कुटूंबियांची त्यांच्या घरी भेट घेतली. यावेळी उमा पानसरे उपस्थित होत्या. दरम्यान, आॅल इंडिया स्टुडंटस् फेडरेशनच्यावतीने मुक्त सैनिक वसाहत येथे बुधवारी सकाळी एक घर - एक पुस्तक अभियानातून सुरु करण्यात आलेल्या पहिल्या क्रांतीज्योती साऊ - राजमाता जिजाऊ सार्वजनिक वाचनालयांच्या उद्घाटन करण्यात आले.

ठळक मुद्देविचारवंतांचा आवाज दडपण्याचा हिंदुत्ववाद्यांचा प्रयत्न : कन्हैय्याकुमारएक घर - एक पुस्तक अभियानाची सुरुवात उमाताईसाऊ-राजमाता जिजाऊ सार्वजनिक वाचनालयांचे उद्घाटन

कोल्हापूर, दि. ८ : जवाहरलाल नेहरू विश्वविद्यापीठातील विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष कन्हैयाकुमार याने बुधवारी सकाळी गोविंद पानसरे यांच्या कुटूंबियांची त्यांच्या घरी भेट घेतली. यावेळी उमा पानसरे उपस्थित होत्या.कन्हैय्याकुमारने यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना हिंदुत्ववादी संघटनांवर टीका केली. विचारवंतांचा आवाज दडपण्याचा हिंदुत्ववादी प्रयत्न करत आहेत, असा आरोप यावेळी त्याने केला.चार विचारवंतांची हत्या झाल्या आहेत, त्यातील एकाही खूनातील आरोपी सापडेले नाहीत, हे दुर्देवी आहे. पानसरे खून खटल्यातील एक संशयित सापडलेला असताना त्यालाही पोलिसांनी सोडून दिले आहे.देश महासत्ता बनविण्याची भाषा बोलणाऱ्यांना या विचारवंतांच्या हत्या करणाऱ्या एकही आरोपी सापडत नाही, हे कशाचे लक्षण आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा आवाज दाबण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत, परंतु त्या मूर्ख लोकांना कळत नाही, की जितका आवाज दाबला जाईल, तितक्या तीव्रतेने तो पुन्हा उभारणार आहे.दरम्यान, आॅल इंडिया स्टुडंटस् फेडरेशनच्यावतीने मुक्त सैनिक वसाहत येथे बुधवारी सकाळी एक घर - एक पुस्तक अभियानातून सुरु करण्यात आलेल्या पहिल्या क्रांतीज्योती साऊ - राजमाता जिजाऊ सार्वजनिक वाचनालयांच्या उद्घाटन करण्यात आले.यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी भालचंद्र कागो, आॅल इंडिया स्टुडंटस् फेडरेशनचे राज्य अध्यक्ष पंकज चव्हाण, सेक्रेटरी सागर दुर्योधन, माजी राष्ट्रीय सेक्रेटरी अभय टाक साळकर, माजी राज्य सेक्रेटरी फिडेल चव्हाण, शहर सचिव आरती रेडेकर यांची उपस्थिती होती.एक घर - एक पुस्तक अभियानाची सुरुवात उमाताई पानसरे यांच्या हस्ते पुस्तक घेऊन झाली. काही महिन्यातच अनेकांनी योगदान दिल्याने सुमारे पंधरा हजार पुस्तके जमा झाली आहेत. याच चळवळीतून हे पहिले वाचनालय सुरु होत आहे. आता जिल्हयात लवकरच दहा ठिकाणी अशा प्रकाराची वाचनालय सुरु होणार आहेत.याप्रसंगी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सरचिटणीस नामदेव गावडे, जिल्हा सचिव अनिल चव्हाण, सतिशचंद्र कांबळे, रघू कांबळे, पांडुरंग रेडेकर, एक घर एक पुस्तक अभियानाचे जिल्हा समन्वयक प्रशांत आंबी, जिल्हा कौन्सिल सदस्य कृष्णा पानसे, आॅल इंडिया स्टुडंटस् फेडरेशनचे जिल्हा उपाध्यक्ष धिरज कठारे, सदस्य संदेश माने, यशराज पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण