शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
3
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
4
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
5
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
6
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
7
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
8
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
9
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
10
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
11
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
12
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
13
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
14
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
15
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
16
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
17
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
18
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
19
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
20
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर

पतंगरावांची गाडी वसगडेत रोखली

By admin | Updated: January 11, 2015 00:38 IST

रास्ता रोको : ऊसप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे कार्यकर्ते आक्रमक

भिलवडी : कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणे सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी प्रती टन २५०० रुपयांवर पहिली उच्चल द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शनिवारी वसगडे (ता. पलूस) येथे सलग तीन तास कडकडीत रास्ता रोको आंदोलन केले. रस्तारोको दरम्यान, पोलीस बंदोबस्तात माजी मंत्री, आमदार डॉ. पतंगराव कदम यांची गाडीही संतप्त शेतक-यांनी रोखून ठेवली. आंदोलकांना न जुमानता कदम यांच्या गाडीने आपला मार्ग बदलल्याने संतप्त झालेल्या आंदोलकांनी साखरसम्राटांच्या निषेधाच्या तीव्र घोषणा दिल्या. यामुळे परिसरात काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सांगली जिल्हा युवा आघाडीचे अध्यक्ष संदीप राजोबा यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सकाळी १० .३० वाजल्यापासून सांगली-पलूस रस्त्यांवर वसगडे गावच्या बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन केले. पलूस तालुक्यातील पाचशेंवर शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला. याचवेळी पतंगराव कदम हे पोलिसांच्या पायलट वाहनांसह पलूसहून वसगडेमार्गे सांगलीला निघाले होते. दुपारी १२ वाजता गाडी वसगडे येथे आंदोलनस्थळी आली. त्यावेळी साखरसम्राटांचा धिक्कार असो,अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. पोलीस अधिकाऱ्यांनी खाली उतरून गाडीला रस्ता देण्याची मागणी केली. मात्र आंदोलकांनी गाडी सोडणार नसल्याचा पावित्रा घेतला, कदम यांनी खाली उतरून शेतकऱ्यांशी संवाद साधावा, अशी विनंती केली. कदम यांनी स्वता:च्या कारखान्यांचा दर जाहिर करुन ऊस दराची कोंडी फोडावी अशीही मागणी आंदोलकांनी केली. मात्र कदम खाली न उतरता त्यांनी गाडयांची दिशा बदलून पाचवा मैलमार्गे ते सांगलीकडे गेले. त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी साखरसम्राटांविरोधात तीव्र घोषणा दिल्या.दुपारी १.३० वा. पलूसचे नायब तहसीलदार बिपीन लोकरे यांनी आंदोलन स्थळास भेट देऊन निवेदन शासनाला कळविण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात स्वाभिमानीचे पलूस तालुका अध्यक्ष सूर्यकांत मोरे, सतीश पाटील, संतोष मोळाज, राजगोंड राजोबा, प्रमोद हजारे, सचिन सूर्यवंशी, लाला हजारे, सुधीर खोत, राजाभाऊ पाटील, संदीप पाटील, हणमंत पाटील आदीसह कार्यकर्ते सहभागी झाले. (प्रतिनिधी)