कोल्हापूर : वाई हत्याकांडातील संशयित नराधम संतोष पोळ हा कळंबा मध्यवर्ती कारागृहातील बरॅकमध्ये पिस्तूल हातामध्ये घेऊन फिरत असल्याचा व्हिडीओ मंगळवारी व्हायरल होताच खळबळ उडाली. कारागृहात त्याच्याकडे पिस्तूल आणि मोबाईल आला कोठून असा प्रश्र्न उपस्थित झालाच परंतू त्याने कारागृह अधिकारी चंद्रकांत आवळे यांनी पिस्तूल आणि मोबाईल पुरविल्याचा व्हिडीओ व्हायरल केल्याने कारागृह प्रशासनाचा गैरकारभार उजेडात आला आहे. या प्रकाराने राज्याच्या गृहखात्यासह कारागृह प्रशासनाचीही लक्तरे वेशीवर टांगली आहेत. या धक्कादायक प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर चौकशी सुरू असल्याची माहिती कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी दिली.
कळंबा कारागृहात कैद्याकडे चक्क पिस्तूल, मोबाईल;वाई हत्याकांडातील संतोष पोळने केला स्वत:चा व्हिडीओ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 21:28 IST