शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

युवक काँग्रेसच्या प्रवक्तेपदी कल्याणी माणगावे यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 15:25 IST

कोल्हापूर येथील मंगळवारपेठेतील अ‍ॅड. कल्याणी माणिकराव माणगावे यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रवक्तेपदी निवड झाली आहे. कोल्हापूरच्या युवतीला पहिल्यांदाच या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. युवक काँग्रेसची नवीन कार्यकारिणी सोमवारी (दि.८) जाहीर झाली. त्याची माहिती युवक काँग्रेसचे प्रदेशाअध्यक्ष सत्यजित तांबे यांनी त्यांच्या आणि युवक कॉँग्रेसच्या फेसबुक पेजवर जाहीर केली आहे.

ठळक मुद्देयुवक काँग्रेसच्या प्रवक्तेपदी कल्याणी माणगावे यांची निवडकोल्हापूरच्या युवतीला पहिल्यांदाच संधी; नवीन कार्यकारिणी जाहीर

कोल्हापूर : येथील मंगळवारपेठेतील अ‍ॅड. कल्याणी माणिकराव माणगावे यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रवक्तेपदी निवड झाली आहे. कोल्हापूरच्या युवतीला पहिल्यांदाच या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. युवक काँग्रेसची नवीन कार्यकारिणी सोमवारी (दि.८) जाहीर झाली. त्याची माहिती युवक काँग्रेसचे प्रदेशाअध्यक्ष सत्यजित तांबे यांनी त्यांच्या आणि युवक कॉँग्रेसच्या फेसबुक पेजवर जाहीर केली आहे.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसने नवीन कार्यकारिणीची निवड केली आहे. त्यामध्ये राज्यातील नवीन युवक-युवतींना संधी दिली आहे. या कार्यकारिणीमध्ये पाच प्रवक्त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यात कोल्हापूरच्या अ‍ॅड. कल्याणी माणगावे यांचा समावेश आहे. त्यांची सहा महिन्यांपूर्वी युवक काँग्रेसच्या सचिवपदी नियुक्ती झाली होती.

राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील कल्याणी यांना पहिल्यांदाच या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे, आमदार सतेज पाटील, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रवक्तेपदी निवड झाल्याचा खूप आनंद होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर दक्षिण, इचलकरंजी आणि करवीर मतदारसंघातील युवतींचे संघटन करण्यावर माझा भर राहणार आहे. युवती, युवकांमध्ये समाजासाठी काम करण्याची तळमळ, नेतृत्व करण्याची क्षमता असतील, तर त्यांना पक्षात काम करण्याची संधी नक्कीच आहे. युवापिढीच्या प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी युवती, युवकांनी राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आले पाहिजे, तरच चित्र बदलणार आहे.-अ‍ॅड. कल्याणी माणगावे.

राज्यातील अन्य प्रवक्तेब्रिज किशोर दत्त (ठाणे), नयना गावीत (नाशिक), रिषिका राका (भिवंडी), बालाजी गाडे (नांदेड) आणि आनंद सिंग यांची युवक काँग्रेसच्या प्रवक्तेपदी निवड झाली आहे. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसkolhapurकोल्हापूर