शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या अनिशा राजमानेला प्रतिष्ठेची कल्पना चावला शिष्यवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 18:06 IST

फ्रान्सच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ विद्यापीठामार्फत (इंटरनॅशनल स्पेस युनिर्व्हसिटी -आयएसयू) कोल्हापूरच्या अनिशा अशोक राजमाने हिची प्रतिष्ठेच्या कल्पना चावला आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. ही शिष्यवृत्ती मिळविणारी ती यावर्षीची जगातील एकमेव विद्यार्थिनी आहे.

ठळक मुद्देकोल्हापूरच्या अनिशा राजमानेला प्रतिष्ठेची कल्पना चावला शिष्यवृत्तीफ्रान्सच्या संस्थेकडून निवड : नेदरलँड येथील कार्यक्रमात होणार सहभागी

कोल्हापूर : फ्रान्सच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ विद्यापीठामार्फत (इंटरनॅशनल स्पेस युनिर्व्हसिटी -आयएसयू) कोल्हापूरच्या अनिशा अशोक राजमाने हिची प्रतिष्ठेच्या कल्पना चावला आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. ही शिष्यवृत्ती मिळविणारी ती यावर्षीची जगातील एकमेव विद्यार्थिनी आहे.२३ वर्षीय अनिशाने कोल्हापूरात केआयटी कॉलेजमध्ये प्रॉडक्शन इंजिनिअरिंग पूर्ण केले आहे. २५ जून ते २४ आॅगस्ट या कालावधीत नेदरलँड येथे होणाऱ्या ३१ व्या वार्षिक अंतराळ संशोधन कार्यक्रमात ती सहभागी होत असून तीन डच अंतराळ संस्थेमार्फत हा कार्यक्रम होत आहे.१४ मार्च रोजी आयएसयू या संस्थेकडून अनिशाला ही शिष्यवृत्ती मिळाल्याचे पत्र मिळाले. पुण्यातील एका संस्थेमार्फत अनिशाने अवकाश शास्त्रासंदर्भात एक निबंध लिहिला होता. त्यानंतर आयएसयू या संस्थेने तिची या शिष्यवृत्तीसाठी निवड केली. १८.५00 युरो पैकी अनिशाला १७ हजार ५00 युरोंची शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय संस्थेच्या समितीने घेतल्याचे तिला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.आयएसयू या संस्थेमार्फत दरवर्षी अवकाश संशोधन कार्यक्रमातंर्गत जगभरातील एका विद्यार्थिनीची कल्पना चावला शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात येत असते. अवकाश संशोधन या विषयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला प्रोत्साहन देणे हा या शिष्यवृत्तीचा हेतू आहे. यापूर्वी अमरावतीच्या सोनल बाभरवाल या विद्यार्थिनीला या शिष्यवृत्तीचा सन्मान मिळाला होता.भारतीय वंशाच्या अवकाश शास्त्रज्ञ कल्पना चावला यांच्या सन्मानार्थ ही शिष्यवृत्ती देण्यात येते. कल्पना चावला यांचा १ फेब्रुवारी २00३ मध्ये कोलंबिया यान दुर्घटनेत मृत्यू झाला होता. 

कल्पना चावला आणि एपीजे अब्दुल कलाम हे माझे आवडते शास्त्रज्ञ आहेत. कल्पना चावला यांच्या नावे मिळालेली शिष्यवृत्ती ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. मला नासा किंवा इसा (युरोपियन स्पेस एजन्सी) या अवकाश संस्थेसाठी काम करण्याची इच्छा आहे.अनिशा अशोक राजमाने,कोल्हापूर. 

टॅग्स :scienceविज्ञानkolhapurकोल्हापूर