शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

कळेत शिवसेना-‘जनसुराज्य’मध्येच सामना

By admin | Updated: January 20, 2017 00:01 IST

दहा वर्षांनंतर सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण : दिग्गज कार्यकर्ते कसून तयारीला लागले

सरदार काळे ---कळे  कळे जिल्हा परिषद मतदारसंघाचे आरक्षण दहा वर्षांनंतर खुल्या प्रवर्गाचे झाल्याने दिग्गज कार्यकर्ते कसून तयारीला लागले आहेत. २०१२च्या निवडणुकीवेळी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, जनसुराज्य, शेकाप अशी बहुरंगी लढत झाली. शिवसेनेने ही जागा जिंकली होती. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, जनसुराज्य, रिपाइं, शेकाप, आदी पक्ष संघटनांच्या आघाड्या, युती कशा होतात, यावरच चित्र अवलंबून आहे. काँग्रेस, जनसुराज्य, शिवसेना, भाजप यांच्यातच खरा सामना होईल. आरक्षण सर्वसाधारण खुले झाल्याने इच्छुकांची संख्या वाढली असून, उमेदवारांची निवड करताना नेतेमंडळींची दमछाक होणार हे निश्चित आहे. २०१२ सालच्या निवडणुकीत आमदार चंद्रदीप नरके यांनी विकासकामांच्या जोरावर व कार्यकर्त्यांच्या बळावर सुजाता वसंत पाटील यांना निवडून आणून काँग्रेस, राष्ट्रवादी, जनसुराज्य यांना धक्का दिला होता, तर पंचायत समितीच्या कळे गणातून शिवसेनेच्याच भारती संभाजी पाटील या निवडून आल्या होत्या. वेतवडे गणातून जनसुराज्य पक्षाकडून विलास गणपती पाटील यांना निवडून आणून माजी मंत्री विनय कोरे यांनी आपला बालेकिल्ला अबाधित ठेवला होता. कळे जिल्हा परिषद मतदारसंघातील सध्याची राजकीय समीकरणे पाहता गत २०१२च्या निवडणुकीत काँग्रेस व जनसुराज्य यांच्यामध्ये मतांची विभागणी झाल्याने शिवसेनेचा उमेदवार निवडून आल्याने पुन्हा त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून काँग्रेस व जनसुराज्य युती होण्याची शक्यता आहे. याबाबत पणुत्रे येथे झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात माजी मंत्री विनय कोरे यांनीही अनुकूलता दर्शविली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, मार्केटिंग फेडरेशनचे माजी संचालक संदीप नरके यांच्या एकत्रित विचाराने जनसुराज्य पक्षाबरोबर युती केल्यास निश्चितच त्यांच्या उमेदवारीची ताकद भक्कम होणार आहे. असे झाल्यास आमदार चंद्रदीप नरके शिवसेनेकडून तितक्याच ताकदीचा सक्षम उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कळेच्या ग्रामपंचायत निवडणुकीत सर्जेराव ज्ञानदेव पाटील यांनी एकहाती विजय मिळविल्याने तेच या निवडणुकीत शिवसेनेचे संभाव्य प्रबळ उमेदवार मानले जात असले, तरी शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते, सक्रिय सभासद, तालुका अध्यक्ष सर्जेराव दत्तू मोळे यांच्याही नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. विद्यमान जिल्हा परिषद सदस्या सुजाता पाटील यांनी पती वसंत पाटील व दीर विलास पाटील यांच्या साथीने गत पाच वर्षांत गावा-गावांत विविध विकासकामे केली आहेत. विलास शंकर पाटील यांना शिवसेनेची उमेदवारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.पंचायत समितीच्या गत निवडणुकीत जनसुराज्य पक्षाकडून निवडून आलेले विलास गणपती पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विलास पाटील यांचीही कार्यकर्त्यांची फळी मोठी असल्याने काँग्रेसकडून त्यांना उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. २००७ च्या निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाकडून निवडून आलेले बाळासो मोळे हे आता काँग्रेसमधून इच्छुक आहेत. त्याचबरोबर कळेचे माजी उपसरपंच, भैरवनाथ तालमीचे अध्यक्ष रामचंद्र इंजुळकर, बापू पाटील, सरदार पाटील , सुरेश पाटील, विश्वास आंग्रे यांच्याही नावाची काँग्रेसमधून उमेदवारीसाठी चर्चा सुरू आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाकडून संजय दिनकर पाटील, युवराज बेलेकर, इच्छुक आहेत. राष्ट्रवादीतून संभाजी कापडे इच्छुक आहेत.२०१२ च्या लढती १) सुजाता वसंत पाटील - शिवसेना - १०४३३२) शालाबाई गणपती बेळेकेर - जनसुराज्य - ९५८३३) उर्मिला गणपती मोळे - ४५८३